Ticker

6/recent/ticker-posts

टेंभा गावचे सचिन सातवी यांचा प्रामाणिकपणा; सापडलेली बॅग मूळ मालकाला परत केली

 


पत्रकार. धनंजय घरत वैतरणा शहापूर

टेंभा गावचे रहिवासी सचिन सातवी यांनी एक आदर्श प्रामाणिकपणाचा दाखला दिला आहे. त्यांना रस्त्यावर सापडलेली बॅग त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता तिचे मूळ मालक अविनाश शिंदे (रा. पारनेर, अहिल्यानगर) यांच्याकडे परत केली.

बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम आणि वैयक्तिक वस्तू होत्या. बॅग परत मिळाल्याने अविनाश शिंदे यांनी सचिन सातवी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत.सचिन सातवी यांचा हा प्रामाणिकपणा समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.