भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
कुही तालुक्यातली ओळखंली जाणारी व्यापारी नगरी म्हणुन मांढळ
उमरेड : छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानकावर फेरीवाल्यांच्या अतिक्रमित दुकांनामुळे वाहतुकीची प्रचंड गर्दी होत असल्यामुळे बसस्थानकावर वाहतुकीची कोंडी होत आहे. याचा भडका उडालेला आज दि.२६ डिसेंबर रोजी दु.३:३० वाजताच्या दरम्यान पाहायला मिळाली. मांढळ बसस्थानकावर आंभोरा येथून उमरेड ला जाण्यासाठी एसटी बस आली. तेव्हा तेथे एक रस्त्यावर कार उभी होती.बस आली तेव्हा कारच्या आरशाला थोडा धक्का लागला.तेव्हा कारचालकाचे पित्त खवळले. आणि प्रचंड राडा झाला.यांच्या भांडणात बसच्या मागे अनेक वाहनांची रांग लागली होती.त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती.प्रवासी खोळंबून उभे होते.
मांढळ ही व्यापारी नगरी म्हणून उदयास आल्याने पंचक्रोशीतील नागरिक,विद्यार्थी शेतमजूर व अन्य नागरिक रोजाना येथे येत असतात.प्रत्येक जण सामानाची खरेदी - विक्री,शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी,नागपूर,उमरेड,भंडारा,रामटेक,कळमना मार्केट येथे जाण्यायेण्यासाठी दररोज ये - जा करीत असतात.यातच बसेस वेळेवर येत नसल्याने बसस्थानकावर प्रचंड गर्दी होत असते.यातच फेरीवाल्यांनी आपली दुकाने फुटपाथवर व बस निवाऱ्याच्या समोर लावल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला दररोज लावीत असल्याने बसस्थानकावरील रस्त्यावर प्रचंड गर्दी होते.तसेच अवैध वाहतुकीची अनेक वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने व वाहनांच्या सततच्या ये - जा सुरू राहत असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे फार कठीण होत असते.यापूर्वी याच ठिकाणावर अनेक अपघात झालेले आहेत,तेव्हा ग्रामपंचायत प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग मांढळ बसस्थानकावर होत असलेले ही वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाकडे लक्ष्य पुरवितील काय? असा प्रश्न नागरिक विचारीत आहे.





Social Plugin