बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध मध्ये भारतीय गणित शास्त्रज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची जयंती साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन हा राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो .विद्यालयाचे प्राचार्य श्री अंकुश भांगरे व पर्यवेक्षक नाना दडस विद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी श्रीनिवास रामानुजन यांना अभिवादन केले .
विद्यालयातील सहशिक्षक भगवान सरवदे यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या कार्याविषयी व त्यांनी गणितात केलेल्या संशोधनाविषयी माहिती सांगितली तसेच अंकगणिताची आकडेमोड व जादू या संदर्भात माहिती दिली .भारतासाठी व जगासाठी त्यांचे कार्य अद्वितीय ठरले असे त्यांनी मनोगत मध्ये सांगितले . कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन तानाजी पाटील यांनी केले .





Social Plugin