Ticker

6/recent/ticker-posts

विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

 




भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

उमरेड - उमरेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ या निवडणुकीत १३ नगरसेवक काँग्रेसचे निवडून आले. उमरेड  नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ या निवडणुकीत माजी.आमदार श्री राजेंद्र मूळक काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

     आज दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी उमरेड येथील जनसंपर्क कार्यालयात उमरेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निवडणुकीत माजी.आमदार श्री राजेंद्र मूळक यांनी काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले व सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संपूर्ण प्रक्रियेत साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे, समर्थकांचे आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले.पुढील काळात अधिक ताकतीने, अधिक तयारीने आणि अधिक जनसंपर्कातून शहराच्या विकासासाठी योगदान देत राहू असे माजी आमदार श्री राजेंद्र मूळक पत्रकारांशी बोलतांना म्हणाले.