Ticker

6/recent/ticker-posts

तहसील कार्यालय भोकरदन येथे आमरण उपोषण.



प्रतिनिधी :निरंजन बावस्कर 

 भोकरदन: भोकरदन तालुक्यात रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांनी वृक्षलागवड ,सिंचन विहीर गायगोठा  यांचा लाभ घेतला. हे पूर्ण कामे चालू असून देखील  पंचायत समिती भोकरदन प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत शेतकरी पुत्र नारायण लोखंडे, विकास जाधव गेल्या दोन दिवसापासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

        या कडाक्याच्या थंडीत सुद्धा आमरण उपोषण सुरू आहे. मात्र प्रशासन गाढ झोपेत असून स्थानिक लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहे.