** महिला सक्षमीकरणाची झलक! सखी बूथवर सुरेखा बडे , सुवर्णा चौरे, ज्योत्स्ना देशमुख व योगिता राठोड यांची उत्कृष्ट कामगिरी
*सखी मतदान केंद्रावर महिला मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाची जबाबदारी पाडली यशस्वीरित्या पार*
सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा :- मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेल्या वेळेनुसार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी नगर परिषद निवडणूक मतदान यशस्वीरित्या पार पडले.
नगर परिषद सिंदखेड राजा निवडणुकीमध्ये मा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड राजा येथे आदर्श सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.
सिंदखेडराजा नगर परिषद निवडणुकीमध्ये एकूण 21 मतदान केंद्रे होते, त्यामधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 7/1 साठी दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या मतदानासाठी आदर्श सखी मतदान केंद्र सज्ज करण्यात आले होते. हे आदर्श सखी मतदान केंद्र महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय सिंदखेड राजा येथे हे मतदान केंद्र होते, या मतदान केंद्रावर एकूण 315 स्त्री आणि 353 पुरुष असे मिळून एकूण 668 मतदारांची येथे नोंद होती, त्यापैकी एकूण 585 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजेच या सखी मतदान केंद्रावर विक्रमी असे 87.57% मतदान यशस्वीरित्या पार पडले.
विशेष बाब म्हणजे मतदान केंद्र क्रमांक 7/1 आणि 7/2 या दोन्ही केंद्रावर सायंकाळी 5 नंतर विक्रमी गर्दी ची रांग लागली होती, रात्री 8:30 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली होती. या पथकामध्ये मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सुरेखा रामराव बडे यांनी दिलेली जबाबदारी उत्तमपने पार पाडली, सोबतीला सुवर्णा त्र्यंबक चौरे,ज्योत्सना कैलासराव देशमुख,योगिता ब्रिजलाल राठोड यांनी मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मिळाली जबाबदारी पार पाडण्यासाठी सुरेखा रामराव बडे तसेच सर्व मतदान अधिकारी महिला यांची ही निवडणूकीची पहिलीच ड्युटी होती, त्यामुळे त्या सर्व जणी थोड्याशा गोंधळलेल्या अवस्थेत होत्या त्यावेळी त्यांना मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.
संजय खडसे साहेबांनी त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करून त्यांचे मनोबल वाढवले आणि त्यांना तुम्ही ही जबाबदारी यशस्वी रित्या पार पाडाल याचा विश्वास दाखवला, आणि घडले हे तसेच या सर्व महिला भगिनींनी त्यांना दिलेली कर्तव्य अगदी चोखपणे आणि यशस्वीरित्या आणि विक्रमी पद्धतीने 87.57% मतदान घेऊन दाखवले. या सखी मतदान केंद्राच्या सर्व टीमचे मा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे साहेबांनी कौतुक केले त्यावेळी शेवटी मतदान केंद्राध्यक्ष सुरेखा रामराव बडे यांनी साहेबांचे आभार मानले.





Social Plugin