गटवीकास अधिकारी, सरपंचांना निलंबीत करा, अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
शिरढोण, ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय समाजाच्या महिलांसाठी तत्काळ सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून द्या.रोटी, कपडा आणि मकान यांचबरोबर आता स्वच्छतागृहाची गरज असल्याने मगासवर्गीय महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसेच सरपंचांना ताबडतोब नीलंबीत करा मी लगेच आपले उपोषण आंदोलन मागे घेतो असे मत रिपब्लिकन सेनेचे राज्य पातळीवरील नेते तसेच आंदोलनकर्ते रमेश उबाळे यांनी व्यक्त केले.
शिरढोण येथील मागासवर्गीय महिलांचे सार्वजनिक आठ स्वच्छतागृह एका समाजकंटकाने पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रमेश उबाळे यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यावेळी बोलताना रमेश उबाळे बोलत होते. यावेळी शिरढोणचे माजी उपसरपंच यदु खंडाईत व रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
रमेश उबाळे पुढे म्हणाले, शिरढोण येथील मगासवर्गीय महिलांसाठी बांधण्यात आलेले आठ स्वच्छतागृह एका समाजकंटकाने पाडले आहे.पाच महिने झालेतरी महिलांसाठी पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने महिलांना उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे. विशेष म्हणजे कोरेगाव पंचायत समितीमध्ये गटवीकास अधिकारी महिला आहेत तरीही त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे हेच आमचे दुर्दैव आहे. म्हणून महिला गटविकास अधिकारी व शिरढोणच्या सरपंचांना तत्काळ नीलंबीत करुन शिरढोण येथील महिलांसाठी ताबडतोब स्वच्छतागृह बांधून दिल्याशिवाय आपण आपले उपोषण आंदोलन मागे घेणार नाही.
कोरेगाव पंचायत समितीमध्ये महिला गटवीकास अधिकारी, पोलीस उपाधीक्षक महिला आहेत. तरीही माझ्या मागासवर्गीया भगिनींला उघड्यावर शौचासं बसावे लागत आहे ही शोकांतिका असून प्रशासनात सर्व मिलीभगत असल्याने हा अन्याय होत आहे. रोटी, कपडा आणि मकान याबरोबर आता स्वच्छतागृह गरजेचे आहे. माझ्या गरीब मागसवर्गीया कुटूंबातील लोकांना स्वतःचे स्वच्छतागृह बांधणे शक्य नाही. सरकारने सार्वजनिक स्वछतागृह बांधून दिलेतर हे स्वच्छतागृह समाजकंट पाडून टाकतात. आणि हे स्वच्छतागृह पडल्यानंतर पाच-पाच महिने माझ्या मागसवर्गीय महिलांना उघड्यावर शौचास बसावे लागते. हा अन्याय आहे. पाच महिन्यापूर्वीही आपण याविरुद्ध आंदोलन छेडले होते त्यावेळीही कुणी मनावर घेतले नाही. त्यामुळे माझा प्राण गेला तरी बेहत्तर गटवीकास अधिकारी व सरपंच यांना नीलंबीत केल्याशिवाय आपण आंदोलन मागे घेणार नाही असेही रमेश उबाळे यावेळी म्हणाले.
आंदोलनात रिपब्लिकन सेनेचे महासचिव नितीन रोकडे, तालूका अध्यक्ष दीपक गाडे, गौतम रणदिवे, रमेश गायकवाड, उजवला कांबळे, अरुणा खंडाईत, सविता खंडाईत, अनिता खंडाईत, सविता खंडाईत, अनिता खंडाईत, सुजाता खंडाईत, वंदना खंडाईत सुनीता जावळे, सारिका येंवले, सुनीता येंवले, सूनंदा खंडाईत, हेमाताई खंडाईत, शर्मिला खंडाईत, निरा कांबळे, आदी महिला सहभागी झाल्या होत्या.
महिलेची महिलेला दया येत नाही ही लोकशाहीतील शोकांतिका कोरेगावमध्ये पोलीस अधीक्षक महिला, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी महिला असुनही महिलांना न्याय मिळत नाही. महिलेची दया महिलेला नाही ही लोकशाहीतील शोकांतिका आहे. असे सांगत रमेश उबाळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली.
छायाचित्र - - जिल्हा परिषदेसमोर रमेश उबाळे यांनी उपोषण आंदोलन सुरू केले त्यावेळी उपस्थित सनेचे पदाधिकारी व नागरिक.





Social Plugin