बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाच्या वतीने 'ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६' अंतर्गत उद्यानदूतांचे बुध ता. खटाव येथे ग्रामस्थांकडून उत्साहात स्वागत करण्यात आले. हे विद्यार्थी पुढील २० आठवडे गावात वास्तव्यास असून ते शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
गावात दाखल झाल्यानंतर उद्यानदूतांनी सरपंच सौ.सुजाता दत्तात्रय बोराटे उपसरपंच श्री.उभयराजे उदयसिंह घाटगे, ग्रामसेवक श्री.महेश शिवाजी ताम्हाने आणि प्रगतशील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढील २० आठवड्यांत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने शेतीविषयक प्रात्यक्षिके, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण आणि शेतकरी शास्त्रज्ञ चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन उद्यानदूतांनी केले, ज्याला उपस्थितांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
केवळ पुस्तकी ज्ञान न वापरता, हे विद्यार्थी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवातून आणि त्यांच्या पारंपारिक शेती पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर वैज्ञानिक उपाययोजना सुचवण्याचे काम हे उद्यानदूत करणार आहेत.यामध्ये जाधव आदेश ,भोसले प्रणव , भोईटे राम , गाढवे मयुर , बनकर रोहन , डांगे गौरव हे उद्यानदुत कार्यरत राहणार आहेत .
हा उपक्रम श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कृषिविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी. पाटील, प्रा. डॉ. जे. व्ही. लेंभें यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे.





Social Plugin