Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील ११५ श्रद्धाळूंचा दक्षिण भारत दर्शन यात्रेसाठी उत्साहात प्रस्थान



*रामेश्वर धामसह २९ तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेणार यात्रेकरू*

वाशीम प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले

मालेगाव : संत गजानन महाराज मंदिर, मालेगाव यांच्या वतीने आयोजित दक्षिण भारत दर्शन यात्रेला जिल्ह्यातील तब्बल ११५ श्रद्धाळूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सोमवारी सकाळी भक्तिमय वातावरणात यात्रेकरूंनी रामेश्वर धामासह विविध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी प्रस्थान केले.

     सेवाभावी उपक्रमाचा एक भाग म्हणून वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित, सोयीस्कर आणि आरामदायी तीर्थदर्शन घडावे, या उद्देशाने संस्थानतर्फे तसेच विशाल महाराज कुकडे यांच्या सहकार्याने या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेकरूंना संपूर्ण मार्गात भोजन, राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि धार्मिक कार्यक्रमांची आखणी करून नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली आहे.

     या यात्रेत दक्षिण भारतातील बासर, श्रीशैलम, महानंदी, कालहस्ती, शबरीमाता मंदिर, तिरुपती बालाजी, रामेश्वरम धाम, कन्याकुमारी, मदुराई येथील मीनाक्षी देवी मंदिर अशी एकूण २९ महत्त्वाच्या देवस्थानांची दर्शनयात्रा समाविष्ट आहे. यात्रेकरूंनी या शुभप्रसंगी समाधान, उत्साह आणि अध्यात्मिक आनंद व्यक्त केला.

       संस्थानच्या वतीने ही यात्रा पुढील काही दिवस विविध धार्मिक स्थळांना भेट देत सुरळीतपणे पार पडणार असून यात्रेकरू सुरक्षित परताव्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.