Ticker

6/recent/ticker-posts

संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या४०१ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.

 


प्रतिनिधी: निरंजन बावस्कर

भोकरदन: कोठा कोळी येथे संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 401 व्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांनी फोटोला  पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यानिमित्ताने संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचे काम केले, यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य रामुशेठ बावस्कर यांनी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावरती मार्गदर्शन करत असताना त्यांनी संताजी महाराजांचे कार्य सांगितले 

संत संताजी जगनाडे महाराज हे सतराव्या शतकातील एक महान मराठी संत होते.आणि संत तुकाराम महाराजांचे प्रमुख शिष्य होते. त्यांनी संत तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग लिहून घेऊन तुकाराम गाथेचे संकलन व जतन करण्यात मोलाचे कार्य केले. संताजी महाराजांचे पूर्ण नाव: संताजी विठोबा जगनाडेजन्म: ८ डिसेंबर१६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये सुदुंबरे या गावी झाला.त्यांचे आई-वडील हे विठ्ठल भक्त होते त्यांचा पारंपारिक व्यवसाय तेल गाळण्याचा होता त्यामुळे त्यांना संतू तेली या नावाने सुद्धा ओळखले जात असत.

त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी यमुनाबाई यांच्याशी झाला. लहानपणापासूनच त्यांना  भजन कीर्तन याची आवड होती. संत तुकाराम महाराज हे कीर्तनासाठी त्यांच्या गावी आले असता संताजी महाराज त्यांच्या कीर्तनाने खूप प्रभावित झाले. आणि त्यांनी तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले तुकाराम गाथा लेखन संताजी महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे संत तुकाराम महाराजांनी स्फूर्तीपर गायलेले अभंग लिहून काढले व संकलित केले त्यामुळे तुकाराम गाथा आपल्यापर्यंत सहजरीत्या पोहोचू शकली. तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकऱ्यांमध्ये ते एक होते त्यांनी स्वतःचे देखील अभंग रचले ज्या तेलीसिंधू, शंकरदीपिका व इतर अभंगाचा समावेश आहे त्यांनी त्यांच्या अभंगांमध्ये घाणा हे रूपक वापरून अध्यात्मिक विचार मांडले आहे

     श्री संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला सामाजिक एकता आणि धार्मिक सलोख्याचा संदेश दिला. यावेळी रमेश बावस्कर, सुनील बावस्कर ,विजय बावस्कर, दिलीप बावस्कर, डॉ. गोपाल बावस्कर, राहुल बावस्कर योगेश बावस्कर विवेक बावस्कर नंदकिशोर बावस्कर, शरद बावस्कर नामदेव बावस्कर शालिक बावस्कर, उमेश बावस्कर, विजय गायकवाड, व सर्व तेली समाजबांधव व गावकरी मंडळी उपस्थित होते