(बाबासाहेब धाबेकर विद्यालय यावर्डीच्या पाच विद्यार्थ्यांचा सहभाग, वन हेल्थ थीम वर सादर केलेल्या मूकनाट्याला प्रेक्षकांची दाद)
गुणवंत राठोड कारंजा प्रतिनिधी_
विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर द्वारा स्थानिक झील इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय विदर्भ विज्ञान उत्सव 2025-26 मध्ये विज्ञान नाटिका या स्पर्धेमध्ये बाबासाहेब धाबेकर माध्यमिक विद्यालय यावर्डीच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक व रोख ५०० रुपये प्राप्त केले.
सदर मुकनाट्यामध्ये विद्यालयातील वंश आडोळे, दक्ष दिहाडे, भावेश येवले, सोहम उबाळे, अमन वासे या विद्यार्थ्यांनी मुकनाट्य नाटकाचे उत्तमरित्या सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. वन हेल्थ थिमवर ही नाटिका असून पर्यावरण पूरक सवयी या विषयावर आधारित नाटिकेतून "चुकीच्या सवयी टाळा निसर्ग वाचवा"हा संदेश आहे देण्यात आला.
सदर मूकनाट्य शाळेचे मुख्याध्यापक तथा विज्ञान शिक्षण विजय भड यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केले.
जिल्हास्तरीय विज्ञान विषयांमध्ये द्वितीय क्रमांक आल्याबद्दल विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक विजय भड यांचा विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूरचे नरेंद्र सातफळे, डॉ.मनीषा घारे, सतीश घारे, मंजुषा थत्ते, आशिष तांबोळकर, झील इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम, सचिव चेतना मेश्राम, मुख्याध्यापिका अभिलाषा बासुळे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
विद्यालयाने नाट्य क्षेत्रात मिळवलेले हे पहिले यश आहे. याबद्दल कारंजा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने केंद्रप्रमुख नानासाहेब मुंदे,संस्था अध्यक्ष योगेश खोपे, सचिव हरिदास गंद्रे व समस्त संचालक मंडळ, संपूर्ण गावकरी मंडळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहे.





Social Plugin