Ticker

6/recent/ticker-posts

बाबाराजे पटाईत यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

 


प्रतिनिधी | वाघ संतोष 


विडा (ता. केज) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहशिक्षक बाबाराजे देविदास पटाईत यांचा लोकनेते माजी आ. बाबुराव आडसकर आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद शाळेचे सहशिक्षक बाबाराजे पटाईत यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केज येथील रमेशराव आडसकर प्रतिष्ठानतर्फे

लोकनेते माजी आ. स्व. बाबुरावजी आडसकर आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती. येथील पंचायत समिती सभागृहात १३ डिसेंबर रोजी पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अंबा साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, नगराध्यक्षा सीता बनसोड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनिल केंद्रे, डाएटचे गोरे यांच्या हस्ते बाबाराजे पटाईत यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.