Ticker

6/recent/ticker-posts

कोणाला पाण्याची वानवा, तर कुठ पाण्याची नासाडी





महेंद्र वानखडे ग्रामीण प्रतिनिधी . पिंपळखुटा 

 - मन प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्यामुळे सिंचनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यासाठी  पाटाखालील शेवटच्या  शेतकऱ्यांना कमालीचा संघर्ष करावा लागत असून सुरुवातीच्या काही कालव्यामधून अनाठाई पाण्याची नासाडी होतं  असल्याने पाणी असूनही सिंचन करता येत नाही म्हणून काही शेतकऱ्याची पायपीट चालू आहे.मन प्रकल्पाच्या पिंपळखुटा येथील काही कालव्याला गेट नसल्यामुळे अमर्याद  पाणी वाया जात असून दोन मायनर मधून पाण्याचा जास्त विसर्ग होत असल्यामुळे वहाडा शहापूर आणि पिंपळखुटा येथील काही शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले असून  शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पाचे अभियंता यांनी दोन्ही मायनावर गेट बसवून पाण्याचे नियोजनबद्ध वाटप करण्यासाठी पुढाकार घेतल्यास शेतकऱ्याची ससेहोलपट थांबणार आहे. बरड भागाकडे जाणाऱ्या मायनरला गेट  नसल्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असून   मायनरला  गेट बसवल्यास  शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.