प्रतिनिधी दिपक गुरव@ चाळीसगाव
चाळीसगाव चाळीसगाव नगर परिषदेत आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने बाजी मारली आहे. भाजपाने नगर परिषदेत ३६ पैकी २४ जागांवर विजय मिळवत जोरदार मुसंडी मारत शहर विकास आघाडीला दणका दिला. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदावरही भाजपाच्या प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी अटीतटीच्या लढतीत शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पदमजा राजीव देशमुख यांचा ६०१२ मतांनी पराभव केला. तर माजी आमदार राजीव देशमुख यांचे पुत्र अभिषेक देखमुख हे भाजपा उमेदवाराचा पराभव करून प्रभाग १७ मपून विजयी झाले. गत २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह १३ जागांवर विजय मिळवला होता, मंदा मात्र दणदणीत बहुमत मिळवले, तर शहर १०वर आले. यंदा दोन अपकांनीही विजय मिळवला. या निवडणुकीत मातब्बरांसह काही माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजपाचे शहराध्यक्ष नितीन पाटील व भाजयाचेच माजी शहराध्यक्ष तसेच सध्या उबातमध्ये असलेले घुषोश्वर पाटील यांनाही पराभवाचा धक्का बसला. तर भाजपाचे बंडखोर उमेदवार राजेंद्र चौधरी हे मात्र विजयी झाले. या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
चाळीसगाव नगरपालीकेची निवडणुक यंदा प्रचंड उत्कंठावर्धक ठरली. नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार तर नगरसेवकांच्या ३६ जागांसाठी ११९ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत १०० मतदान केंद्रांवर ६८ टक्के मतदान झाले होते. या 4पोस्टल मतमोजणी पार पडली.
त्यात भाजपाच्या प्रतिभा बच्हाण यांनी किंचीत आघाडी घेतली, तर प्रभाग निहाय मतमोजणीत पहिल्याच प्रभागात भाजपाने दोन्ही जागांवर विजय मिळवला. दुसऱ्या प्रभागात मात्र शहर विकास आघाडीचे दोन्ही उमेदवारांनी विजय मिळवत बरोबरी साधली. त्यानंतर मात्र भाजपाचा वारू सुसाट धावला, भाजपाचे १८ प्रभागांपैकी १० प्रभागांमध्ये दोन्ही उमेदवार निवडून आले तर शहर विकास आघाडीने ३ प्रभागांमध्ये दोन्ही उमेदवार निवडून आले. इतर ठिकाणी एका जागेवर भाजपा तर एका जागेवर शहर विकास आघाडीचा उमेदवार विजयी ठरला, दोन ठिकाणी अपकांनी बाजी मारली.





Social Plugin