बुध दि[ प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त आयोजित 'श्री सेवागिरी चषक' भव्य डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्साहाच्या वातावरणात सुरवात झाली. देवस्थानचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मैदान पूजन करण्यात आले.
उद्घाटन सोहळ्याला चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, ट्रस्टचे माजी पदाधिकारी, पंचक्रोशीतील नामांकित खेळाडू, क्रिकेटप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेतील प्रथम चार क्रमांकाच्या विजेत्या संघांना अनुक्रमे १ लाख रुपये, ७५ हजार रुपये, ५० हजार रुपये, २५ हजार रुपये व प्रत्येक विजेत्या संघाला चषक बक्षीस देण्यात येणार आहे.
अनेक राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत कारकीर्द गाजवलेल्या नामांकित खेळाडूंचा या स्पर्धेमध्ये सहभाग असणार आहे. तरी सर्व क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून या क्रिकेट सामन्यांचा आनंद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे. छायाचित्र - पुसेगाव : क्रिकेट स्पर्धा उद्घाटन प्रसंगी सुंदरगिरी महाराज, ट्रस्टचे पदाधिकारी व ग्रामस्थ. छाया - प्रकाश राजेघाटगे





Social Plugin