बुध दि [प्रकाश राजेघाटगे ]
जाखणगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल, जाखणगाव हायस्कूल मध्ये इयत्ता ८ वी व ९वी शिकणाऱ्या फाली (Future Agriculture Leaders of India) च्या विद्यार्थ्यांनी माती परीक्षण केले .५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. फाली कडून १ डिसेंबर ते ७ डिसेंबर हा सप्ताह माती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे . प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मागील महिन्यामध्ये मातीचे नमुने कसे गोळा करावेत, याचे प्रात्यक्षिक घेतले व त्याप्रमाणे मुलांनी शेतातील मातीचे नमुने गोळा केले व शाळेतील प्रयोगशाळामध्ये मुलांनी मातीमधील नत्र ,स्फुरद ,पालाश व सामू याची उपलब्धता काढली .
माती परीक्षण करत असताना कृषी शिक्षिका पी. एस घोरपडे म्हणाल्या की, रासायनिक खतांच्या वापराने जमिनीचा पोत बिघडत आहे. जमीन नापीक बनत आहे. त्याची उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे किमान तीन वर्षातून एकदा तरी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. असे त्यानीं सांगितले .
शाळेचे मुख्याध्यापक आर. एन. जाधव यांनी ज्या प्रमाणे आपण आजारी पडलो की रक्त तपासनी करून घटक व कमतरता जाणून घेऊन औषध उपचार करतो अगदी तसेच माती परीक्षण करणे गरजेचे आहे असे सांगितले.
फाली मार्फत प्रत्येक वर्षी शाळेमध्ये माती परीक्षण कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते , या कार्यशाळेचा जाखणगाव व परिसरातील जास्तीत जास्त शेतकरयांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले .
या कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र जाधव , बाजीराव वावरे , सुरेश लावंड रत्नसिंह घाटगे , फिरोज मोमीन , संतोष चव्हाण , चंद्रकांत मुठे , संगीता घाडगे , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील शेतकरी प्रात्यक्षिकासाठी उपस्थित होते.





Social Plugin