Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले विजयदुर्ग नाताळच्या सुट्टीत पर्यटकांनी बहरले



 देवगड प्रतिनिधी अमोल शिर्के 

किल्ले विजयदुर्ग क्रिसमस या सणा निमित्त शाळेंना सुट्टी मिळाल्यामुळे बहुसंख्य पर्यटक सिंधुदुर्गात विजयदुर्ग किल्ला बघायला आलेले आहेत. असा हा प्राचीन काळाचा किल्ला पहावयास अनेक पर्यटक गर्दी करताना दिसतात. हा किल्ला पाहण्यासाठी विदेशी पर्यटक, शालेय विद्यार्थी, व असे अनेक इतिहास प्रेमी पर्यटक पहावयास येतात. या किल्ल्यामध्ये त्या पर्यटकांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक ठेवलेले आहेत. हे मार्गदर्शक पर्यटकांना व्यवस्थितपणे मार्गदर्शन करून किल्ल्याची संपूर्ण माहिती व इतिहास त्यांना व्यवस्थितपणे सांगतात. 

किल्ला पाहण्यासाठी बोटिंगची सुद्धा व्यवस्था केली आहे समुद्रातून तुम्ही हा किल्ला सहजरीत्या बघू शकता म्हणजे तेथे बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. पर्यटकांना या सुद्धा संधीचा लाभ घेता येईल. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या आजूबाजूला निसर्गरम्य समुद्र लाभलेला आहे. ते पहावयास पर्यटकांना फार आवडते.असे त्यातील मार्गदर्शक जे करता त्यांचे मत आहे. शिवाय या किल्ल्याला एक बंदर लाभलेले आहे मालाची ए यान करणे बोटी लागण्यासाठी हे बंदर बांधले गेलेले आहे. या किल्ल्यामध्ये हनुमंताचा मंदिर सुद्धा आहे. किल्ल्याची तटबंदी अजून तरी मजबूत आहे. पर्यटक हा किल्ला अतिशय आवडीने पाहतात व तो पाहताना त्यांना एक विलक्षण आनंद जाणवतो असे त्यांच्या चेहऱ्यावर दिसण्यात आलेले आहे. किल्ला पाहताना ते फार प्रसन्न दिसतात. किल्ल्याच्या अवतीभवती खाली उतरताना पायरीवर चहापाण्याची स्टॉल हॉटेलवर आहेत. ते सुद्धा पर्यटकांची योग्य ती काळजी घेऊन त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करतात. क्रिसमस या सणाची सुट्टी लागतच शालेय विद्यार्थ्यांची व कॉलेज कुमारांची गर्दी जास्त प्रमाणात दिसते. ३१ तारीख ला किल्ल्यावर कार्यक्रम आखलेले असतात, स्थानिक लोकांची भजने सुद्धा असतात. तेव्हा  असंख्य पर्यटक, पाहुणे कलाकार, भजन मंडळी, प्रेक्षक वर्ग तेथे ते कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थितीत असतात. असा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राचीन काळी किल्ला अभेद्य व अमर आहे. तो पाहण्यासाठी बघण्यासाठी भाग्य हवे अशा या राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना आमच्या पर्यटकांकडून   मानाचा मुजरा