Ticker

6/recent/ticker-posts

प्राथमिक शिक्षक संघांचे त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न .

 


प्रतिनिधी बाळासाहेब बोधक

      महाराष्ट्र शिक्षक संघ संचलित नेवासे तालुका प्राथमिक शिक्षक संघांचे  त्रैवार्षिक अधिवेशन  रेणुकामता सभागृह येथे  रावसाहेब रोहकले,संजय कळमकर, संजय शेळके आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले .

        शाळा वाचवा -गरीबांच्या मुलांचे शिक्षण वाचवा, कार्यरत शिक्षकांसाठी TET ची अट रद्द करावी,जुनी पेन्शन योजना कायम ठेवावी, संचमान्यता त्रुटी दूर कराव्यात,पदोन्नती कराव्यात, बी एल ओ सह इतर ऑनलाईन व ऑफलाईन कामे बंद करावेत तसेच अन्य मागण्यासाठी ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या शाळाबंद आंदोलनास आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले 

          नेवासे तालुका प्राथमिक शिक्षक संघ त्रैवार्षिक अधिवेशनसाठी प्रवीण ठुबे ,नितीन काकडे,भास्कर नरसाळे,सुरेश निवडूंगे,अल्ताफ शाह, सुदर्शन शिंदे ,अरविंद घोडके, गणेश वाघ,बाळासाहेब रोहकले,हरिभाऊ जाधव, भारत गवळी,गणेश शेलार,संतोष निमसे,दत्तात्रय चोथे,तौसिफ़ सय्यद,संजय फाजगे, राहुल लोखंडे, राजू आडे, सुनीता कर्जुले, अंजली महामेर आदीसह तालुक्यातील सर्व संघ प्रेमी शिक्षक बंधू आणि भगिनी उपस्थित होते. 

          याप्रसंगी तालुका प्राथमिक शिक्षक संघ,संघप्रणित मंडळ, उच्चअधिकार समिती, मुख्याध्यापक शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघ, महिला आघाडी, तंत्रस्नेही शिक्षक संघ, सांस्कृतिक शिक्षक संघ,उर्दू शिक्षक संघ या सर्वसगळ्यांच्या कार्यकारिणी निवडी खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आल्या. आभार राजेंद्र मुंगसे यांनी केले .

प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष-विठ्ठल कांगूणे, शिक्षक संघप्रणित मंडळ अध्यक्ष- सलीम शेख, महिला आघाडी अध्यक्ष- कल्पना माळवदे, उच्चधिकार समिती अध्यक्ष-अशोक मोरे,मुख्याध्यापक संघ अध्यक्ष- गणेश शेलार, पदवीधर संघ अध्यक्ष- शरद खरात, युवा संघ अध्यक्ष- सुभाष भांड, सांस्कृतिक संघ अध्यक्ष- सुभाष चव्हाण, तंत्रस्नेही शिक्षक संघ- प्रकाश मुरकुटे, उर्दू शिक्षक संघ- अनिसा खान अब्दुल समद, शिक्षण सेवक संघ-विकास जासूद .