*जालना जिल्ह्यात अंबड येथील प्रतिष्ठित खरेदी विक्री संघाचे सर्व संचालकांची निर्विरोध निवड;सहकार चळवळीत आनंदाचा माहोल*
अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या सहकारी संस्थांपैकी एक असलेल्या अंबड तालुका सहकारी खरीदी–विक्री संघ मर्यादित,अंबड यांच्या संचालक मंडळाची निवड अत्यंत शांततापूर्ण वातावरणात पार पडली.विशेष म्हणजे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले असून सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज नियमानुसार ठरलेल्या मुदतीत उमेदवारी अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही जागेसाठी विरोधात उमेदवार नसल्याने सर्व १७ संचालकांची निर्विरोध निवड निश्चित करण्यात आली.निवडणूक निर्णयाधिकार्यांनी मंडळाची अधिकृत निवड यादी प्रसिद्ध केली आहे.
*निवडून आलेल्या संचालकांमध्ये*
नरवडे किशोर बंडेराव,हुलमुख सुधाकर परमेश्वर,शेळके विष्णू भगवान,विर पंढरीनाथ शेषराव,कनके संजय आप्पासाहेब,सपकाळ शेषराव धुराजी,भोजणे भगवान मनाजी, लांडे उद्धव जगन्नाथ,तनपुरे नुकुल बाबुराव,हुसे आनंत रामराव हे सर्वसाधारण मतदार संघाचे संचालक,जाधव संजय गंगाधर,ठाकूर दिपकसिंग प्रल्हादसिंग हे व्यक्तीगत मतदार संघाचे संचालक,उघडे देविदास भाऊ हे अनुसूचित जाती किंवा जमातील सदस्य(राखिव मतदार संघ),तायडे आसराबाई राणुजी, शिनगारे शांताबाई काकासाहेब महिला मतदार संघ(राखीव), बागवान जैतनबी बाबुलाल इतर मागासवर्गीय सदस्य(राखीव मतदार संघ),चपटे सतिश भगवान विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागासवर्गीय सदस्य राखीव मतदार संघ संचालकांचा समावेश आहे.याशिवाय राखीव जागांसाठीही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
संचालकांची निवड बिनविरोध झाल्याने संघातील सदस्य, शेतकरी व सहकार कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.संघाच्या व्यवहारिक,आर्थिक आणि सहकार विकासासाठी ही एक मजबूत टीम सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.या मध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांचे नऊ सदस्य तर बदनापूर भारतीय जनता पार्टी चे आमदार नारायण कुचे व सतिश घाटगे याचे आठ सदस्य संघाचे चेअरमन हे टोपे गटाचे व व्हाइस चेअरमन भारतीय जनता पार्टी चा होणार असल्याचे ठरवण्यात आले.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी श्री.संजय भोईटे यांनी आज दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी निवडणुकीचा अधिकृत नमुना–९ (Rule ३२) जाहीर करत सर्व सदस्यांची बिनविरोध निवड अधोरेखित केली.अंबड तालुका खरेदी–विक्री संघाच्या नवीन संचालक मंडळाची निवड निर्विवाद झाल्याने पुढील कार्यकाळात संघाचा विस्तार, शेतकऱ्यांच्या सेवा आणि सहकारी उपक्रमांना मोठी चालना मिळेल,असा विश्वास सहकार क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे...





Social Plugin