ज्ञानदिप पाटील @प्रतिनिधी
" काळजी घेतल्याने काळजी करावी लागत नाही " हेच खरे आपत्ती व्यवस्थापनाचे ब्रीद - रामकृष्ण बाविस्कर, केंद्र प्रमुख
दि १७ , पारोळा आज पारोळा केंद्र समूह जि प व खाजगी प्राथमिक शाळांची ५ वी शिक्षण परिषद मुख्याध्यापिका सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद प्राथमिक विदया मंदिर पारोळा या ठिकाणी केंद्र प्रमुख रामकृष्ण बाविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली गुणवत्तापुर्ण व उत्साहाच्या वातावरणात पार पड
ली . या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक राजेंद्र पाटील , सुनिता पाटील , अझर हुसेन अब्दुल समद , आसीफ बेग मिर्झा , राज्य शिक्षक मनवंतराव साळुंखे यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनी उपस्थित होते .
प्रास्ताविक शाळेच्या सोनाली पाटील यांनी सादर केले . या परिषदेचे मुख्य उद्दिष्टय ठरले ते शालेय आपत्ती व्यवस्थापन व विद्यार्थ्यांना सकारात्मक शिस्त . आपत्ती व्यवस्थापनावर आधारित मुख्याध्यापक उर्दु बॉईज अझर हुसेन अब्दुल समद यांनी बनविलेली आराखडा पुस्तिका अभ्यासपुर्ण व आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरली . मुस्तुफा अरब 'अनिल सोनवणे व मनवंतराव साळुंखे यांनी पर्यावरण व शालेय आपत्ती व्यवस्थापनावर आपले सखोल अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले .
मयुरी पाटील व शितल पाटील यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवुन त्यांना न दुखविता कशी शिस्त लावावी याबाबत माहिती देवुन आपले अनुभव कथन केले . जयहिंद शाळेचे किशोर पवार , संगिता पाटील , सरिता ठाकरे , गुणवंत चौधरी , किरण विसावे , सागर कुमावत , माधुरी पवार , अर्चना जोशी , स्वाती निकम व तृप्ती वाणी यांनी माझा वर्ग माझे नियोजन बाबत आपले मत व अनुभव कथन केले . अगोदर नियोजन केल्या शिवाय कोणतेच कार्य यशस्वी होत नाही याची समज उपस्थित सर्व शिक्षकांना आली .
केंद्र प्रमुख रामकृष्ण बाविस्कर यांनी आपत्ती व्यवस्थापन तेही शालेय खुपच सांभाळुन केले पाहिजे . अगोदरच काळजी घेतली तर नंतर काळजी करावी लागत नाही हे ब्रीद लक्षात ठेवावे . विद्यार्थांना पूर , भूकंप , आग , चेंगरा चेंगरी , बॉम्ब स्फोट , बॉम्ब अफवा , वैदयकीय आणीबाणी , बस अपघात , अपहरण व ओलिस धरणे अशा शालेय सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती विद्यार्थ्यांच्या लक्षात आणुन देवुन त्याबाबत कशी काळजी व दक्षता घ्यावी याची वेळोवेळी माहिती दिली पाहिजे . शाळेतही काही संभाव्य आपत्ती निर्माण होवु नये म्हणुन व्यवस्थापन करावे .
आपल्या शिस्त लावण्याच्या नादात विद्यार्थी दुखावला जाणार नाही याची दक्षता घेवुन त्याला प्रेमाने शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले .शासकिय कामात आधार कार्ड , माजी विद्यार्थी संघ स्थापना , अपार नोंदणी , मुख्यमंत्री माझी शाळा नोंदणी , व्ही एस के ॲपवर हजेरी नोंदणी , शापोआ नोंदणी यांचा आढावा घेवुन ही कामे व दैनंदिन कामे कशी इतरांचीही मदत घेवुन वेळेवर करावी याबाबत सूचना दिल्या .वना महाजन यांनी अतिशय छान सूत्रसंचलन तर हंसराज देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले .





Social Plugin