Ticker

6/recent/ticker-posts

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालनाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ 

अखिल भारतीय ग्राहक पंचायत जालना आणि पवन करिअर अकॅडमी च्या सयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जनजागृती अभियान मोहिम राबविण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक किरणकुमार खाडेंभराड तालुका पुरवठा अधिकारी,कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ रमेश तारगे अध्यक्ष ग्राहक पंचायत जालना तथा अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषद जालना,प्रमुख पाहुणे संतोष जिगे तालुका पत्रकार संघ अध्यक्ष अंबड,देवानंद चित्राल पर्यावरण जिल्हा प्रमुख,दिनकर वाघ,आधार न्युज संपादक  प्रा.शिकारे पवन अकॅडमी ‌प्रमुख आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नायब तहसिलदार खाडेंभराड म्हणाले की राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की ग्राहकाने जागरूक राहिले पाहिजे.आपण घेतलेल्या मालाची रितसर पावती घेतली पाहिजे अंबड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार यांचे कडुन पावती घेऊन च माल खरेदी करावा व तक्रार असल्यास तहसीलदार कार्यालयाशी संपर्क करावा दैनदिन जिवनात सुद्धा जागरुक राहावे‌ असे आवाहन केले.

यावेळी प्रस्ताविक करताना डॉ रमेश तारगे यांनी अखिल भारतीय ग्राहक पंचायत ची भुमिका विषद करतांना संगितले की ग्राहक दिन प्रत्येक वर्षी साजरे होत असतात परंतु,यावर्षी ग्राहक पचांयतला पन्नास वर्षे पूर्ण झाले ‌असुन एक्कावन वर्षात पदार्पण केले आहे.जिल्हा भरातील महाविद्यालयात ग्राहक जनजागृती चा उपक्रम राबवून माहिती पत्रकाद्वारे हजारो लोकापर्यंत ग्राहक कायदा व त्याची माहिती लोकापर्यंत पोहचली पाहिजे यासाठी प्रयत्न आहे.

दैनदिन जिवनात सकाळी ‌ऊठल्यापासुन झोपेपर्यंत आपण ग्राहक आहोत आणि आपली फसवणूक होऊ नये यासाठीं जागरुक राहणे हे तरूणाचे काम आहे त्यासाठी फसवणूक झाल्यास ग्राहक ‌कायद्याची माहिती असली पाहिजे यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत देशभर कार्यरत आहे त्याचा फायदा जनतेने घ्यावा तसेच शासनस्तरावरून जनजागृती साठी शासन तत्पर असुन आर्थिक तरतुद यासाठी उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन व‌ तालुका प्रशासनाने जास्तीत जास्त जनजागृती चे कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन केले.

यावेळी देवा चित्राल यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत विद्यार्थी बांधवांना मार्गदर्शन केले प्रा.शिकारे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन‌ आभार मानले यावेळी ‌मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते..