अमोल शिर्के कलंबई प्रतिनिधी
सध्या कोकणामध्ये आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहर येत आहे. ठिकठिकाणी आंब्यावर डस्टिंग कीटकनाशक फवारणी होत आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचे आंबे सुद्धा तयार झालेले आहेत. कोकणात थंडीचा प्रमाण समतोल असल्यामुळे अजून पर्यंत तरी कणीची गळ नाही. कोकणातील शेतकरी आंब्याला वेळोवेळी व्यवस्थित फवारणी देऊन आपला मोहर कसा वाचवता येईल याकडे लक्ष देत आहे.
योग्य ती कीटकनाशक फवारणी करून आंब्याच्या झाडावरच्या मुळापासून ते फांदीपर्यंत व पानापर्यंत जे त्याच्यावर कीटक तयार होतात त्यांचा फवारणीने बंदोबस केला जात आहे. योग्य त्या फवारणीमुळे आंब्याच्या झाडावरील कीटकांचा बंदोबस होत आहे. आंब्याच्या झाडावर तुडतुडा, भुंगा, थ्रिप्स, कोळी कीड, पतंग किडा, पालवी कीड असे अनेक कीटक आंब्याच्या झाडावर येऊन झाडांचा मोहराचा नायनाट करतात तेव्हा शेतकरी योग्य ते औषध व फवारणी करून त्या कीटकांचा बंदोबस्त करतो.





Social Plugin