समाजिक कार्यकर्ते पवन डुब्बेवार यांची मागणी
हदगाव प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे तळणी शिवारात गट नंबर ७५ मधुन उर्ध्वपैनगंगा प्रकल्प यांचे कॉनलचे दुस्तुची काम सुरु आसुन सदरील कॅनॉलच्या लगत जवळपास ७० वर्षा पुर्वीचे पिंपळाचे, वड,अंबा व कडूलिंब अश्या प्रकारचे जिवंत हिरवीगार झाडे आहे. भारत देश हा निर्सग आणी वणराईने संपन्न आसलेला समृध्द व हरित देश आहे. सदरील वृक्ष मागिल सत्तर वर्षांपासून जिवंत असुन या वृक्षाची कत्तल करण्याचे बेकायदेशीर कृत्य कॅनॉल दुस्तीचे ठेकेदार व इंजिनीअर हे संगणमत करून करीत आहेत.
हि वृक्षतोड बेकायदेशीर आसुन या कृतीला आमचा सक्त विरोध आहे. आम्ही सदरील इंजीनिअर यांना वारंवार सुचना करुन सुध्दा ते या वृक्षाची कत्तल करणार असल्याचे वक्तव्य करत आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. निर्सगाचे पर्यावरण व शेतक-यांच्या पशुधनासह वन्य जिवांचे रक्षण करण्यासाठी या वृक्षांच्या सावलीचा उपयोग असतो त्यामुळे निसर्ग भकास करून कोणता विकास होणार आहे असा आमचा प्रश्न आहे.
वृक्षाच्या परीसरात पाण्याचा हौद असल्याने अणेक रानटी प्राणी येथे पाणी पिण्यसाठी येत असतात त्यामुळे त्यांचे जिवन स्वरक्षण होते.
कष्ठकरी शेतकरी आणी वज्य जिव प्राणी यांच्यासह पाळीव प्राण्यासाठी सदर वृक्षांची सावली हे विसाव्याचे ठिकाण आहे. त्याच बरोबर वड, पिंपळ हे वृक्षवर जनतेची श्रध्दा असल्याने धार्मीक दृष्टया पुजनीय आहे तसेच तेथे मसोबा हे शेतक-यांचे कुल दैवत आहे
तरी तहसीलदार यांना विनंती आहे की, आमच्या निवेदनाची दखल घेवुन होत असलेली वृक्षतोड तात्काळ याबविण्यासाठी कायदेशीर कार्यवाही करून उपकृत करावे अन्यथा वृक्षप्रेमी व गावकऱ्यांच्या वतीने वृक्ष बचाव करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात येईल अस्या विनंतीचे निवेदन समाजिक कार्यकर्ते पवनकुमार डुब्बेवार यांनी हदगावचे तहसीलदार यांना दिले आहे





Social Plugin