Ticker

6/recent/ticker-posts

दोन लाख मोजून दुपारी लग्र, ३ तासांत नवरी पळाली !



केज : महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार वाघ संतोष 

दुपारी लग्न, सायंकाळी गृहप्रवेश आणि रात्री धूम, असा काहीसा फिल्मी प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. लग्नासाठी १ लाख ९० हजार रुपये घेऊन वधूने मंदिरात लग्न केले, पण सासरी पोहोचताच अवघ्या तीन तासांत शौचाच्या बहाण्याने तिने पळ काढला. मात्र नवरदेवाच्या नशिबाने साथ दिली आणि पळून जाणारी नवरी नातेवाइकांच्या तावडीत सापडली. आता या लुटेरी दुल्हनची रवानगी सासरऐवजी थेट पोलिस कोठडीत झाली आहे. नागेश देविदास जगताप (३६, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे फसवणूक झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. तर प्रीती शिवाजी राऊत असे अटक केलेल्या नवरीचे नाव आहे.

संभाजीनगर येथील एजंट प्रल्हाद गुळभिले याने नागेश जगताप यांच्याकडून लग्नासाठी १ लाख ९० हजार रुपये घेतले. ६ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता दिपेवडगाव येथील हनुमान मंदिरात नागेश आणि प्रीतीचे लग्न लावून दिले. त्यानंतर वऱ्हाड कोदरी येथे परतले. घरात नवीन सून आली म्हणून आनंदाचे वातावरण होते. मात्र सायंकाळी ४ वाजता प्रीतीने शौचाला जाण्याचा बहाणा केला आणि घरातून पळ काढला. तिला पळताना गावातील एका व्यक्तीने पाहिले आणि आरडाओरड केली. नातेवाइकांनी पाठलाग करून तिला डिघोळअंबा पाटीजवळ पकडले. यावेळी तिने पोलिसांना फोन करून आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस ठाण्यात पोहोचल्यावर तिचे बिंग

फुटले. हे एक रॅकेट असल्याचे समोर आले. प्रीतीसोबत आलेली तिची मावशी सविता (रा. पुणे), माया सतीश राऊत (रा. चाकण) आणि एजंट प्रल्हाद गुळभिले यांनी

डिसेंबर : एजंट प्रल्हादचा 1 लग्रासाठी फोन.

2डिसेंबर : १० हजार रुपये खात्यावर जमा.

4 डिसेंबर : लॉजसाठी १९ हजार रुपये दिले.

5 डिसेंबर : खरेदीसाठी १ लाख ७० हजार रुपये घेतले.

डिसेंबर : दुपारी १२:३० वाजता लग्र, ४ वाजता नवरी पळाली.

फसवणूक केल्याचे कबूल केले. प्रीती राऊतसह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नवरीला १० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.