Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेडराजा तालुक्यात बिबट्याची धुमाकूळ, आडगाव राजा हादरलं!





शेतकऱ्यामध्ये भितीचे वातावरण : बंदोबस्त करण्याची मागणी

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेड राजा : देऊळगाव राजा वनपरीक्षेत्र अधिकारी रेंज ऑफिस अंतर्गत पळसखेड चक्का बिट मधील आडगाव राजा शिवारात भागवत राजे जाधव (पांडेबा ) यांच्या शेतात शेतकरी भिकाजी शिपणे हे आपले गुऱ्हे शेतात चारत असताना सायकाळी  ०७ वाजे च्या सुमारास अचानक बिबट्या दिसून आल्याने अत्यंत धावत पळत गावात धाव घेतली व गावातील सर्वं नागरिकांना बिबट्या त्यांच्या निदर्शनास आला असल्याची माहिती कळवली असता गजानन कहाळे आडगाव राजा यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी देऊळगाव राजा उमेश गायकवाड यांना कळविले आसता त्यांनी तात्काळ नागरिकांच्या सुरक्षतेचा प्रश्न लक्षात घेता आपलें वन विभागाचे कर्मचारी सिंदखेड राजा वर्तुळ वनपाल श्री, देशमुख साहेब, व पळसखेड चक्का बिट च्या वनरक्षक, रुपम वाडेकर मॅडम, तसेच, वनमजूर, श्रीराम केकान सह घटस्थळी हजर झाले व त्या ठिकाणच्या परिसरात शोध घेतला मात्र परिसरात बिबट्या आढळला नाही तरी त्यांनी, शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे कळविले तसेच बिबट्या, वाघ, तडस, यांच्या मागाच्या ठश्या बद्दल माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांनी सोबत चार पाच लोक मिळून रहावे सोबत टॉर्च वापरा, काठीला घुंगरु वापरावे, तसेच बिबट्या आढळून आल्यास आपल्या वनविभागास तात्काळ कळवावे असे कळविले आसता गावातील घटस्थळी बिबट्या पाहण्यास गावातील शेकडो नागरिक उपस्थिती होते. मात्र बिबट्या आढळून आला नसल्याने परत त्या ठिकानि चौकशी सुरु राहील अशी माहिती वनविभाग यांनी दिली.