ग्रामस्थांचा संताप उसळला संघटनांचा निषेध; पदाधिकाऱ्यांच्या हातात महापुरुषांचे फोटो देत डॉल्बीसह मिरवणूक
दुधगांव. ता.मिरज — ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित फोटो पूजनावेळी गंभीर निष्काळजीपणाचा प्रकार उजेडात आला आहे. पूजनासाठी लावलेल्या बाबासाहेबांच्या फोटोवर चिकटटेप लावण्यात आले होते, तसेच त्या खाली दुसऱ्या महापुरुषाचा फोटो चिटकवण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकाराला आंबेडकर संघटनांनी महापुरुषांचा अवमान ठरवत ग्रामपंचायतीचा जाहीर निषेध नोंदवला. भविष्यातील सर्व शासकीय व सामाजिक कार्यक्रमात महापुरुषांचे स्वतंत्र, सुस्थितीत आणि सन्मानपूर्वक फोटो लावावेत, अशी मागणी संघटनांनी केली.
नागरिकांच्या रोषामुळे ग्रामपंचायतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे प्रतिमेचे पुनःपूजन करून माफी व्यक्त केली.
मात्र कार्यकर्त्यांनी हा मुद्दा अधिक ठळकपणे मांडण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हातात महापुरुषांचे फोटो देत महापुरुषांचा सन्मान राखण्यासाठीचा ठाम संदेश दिला. मिरवणुकीत युवक, महिला, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. या मिरवणुकीतून एकमुखी संदेश देण्यात आला— “गावातील कोणत्याही कार्यक्रमात महापुरुषांचा सन्मान अबाधित ठेवला गेला पाहिजे.”
.png)




Social Plugin