Ticker

6/recent/ticker-posts

नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व नवसेवकांचा सत्कार .

 


भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी

उमरेड - आज दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी माजी आमदार मा.श्री राजू पारवे  यांच्या निवासस्थानी उमरेड  नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्ष व नवसेवकांचा सत्कार तथा दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून त्यांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. जनतेने भाजपावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी अध्यक्ष व नगरसेवकांनी शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता,आरोग्य, शिक्षण तसेच नागरी मूलभूत सुविधांच्या विकासासाठी लोकाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.