Ticker

6/recent/ticker-posts

लहान येथे ठेवलेल्या मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.



ग्रामीण प्रतिनिधी विश्वराज वाकोडे

         लहान येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा शिवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस श्री.मा.परमेश्वर बळीराम लालमे यांची छोठी मुलगी आराध्या परमेश्वर लालमे हिच्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ श्री. मा. डॉक्टर उत्तमराव इंगळे साहेब तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लहान येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तथा माजी उपसरपंच सतीशराव लहानकर साहेब उपस्थित होते.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.मा.विलासआप्पा कापसे तसेच लहान येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.मा. गोविंदराव पाटील हारकरी तंटामुक्तीचे उपाध्यक्ष श्री राजू लोणे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी श्री.मा. मंगेशराव कुऱ्हाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संभाजीराव आंबेकर तसेच लहान चे माजी सरपंच एल.बी. रणखांब साहेब,सुनील आण्णा देशमुख, माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ता पाटील इंगळे,माजी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, बबनराव बोक्से पाटील, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्र. सिध्दांतभाऊ वाहेवळ, सदस्य, प्रभाकरभाऊ आंबेकर,संतोषराव देशमुख, गोविंदराव नितनवरे, गणेशराव वाहेवळ, बाबुरावआप्पा बिच्चेवार, सुभाषराव मंत्रे, गजानन कदम, गणेशभाऊ श्रीमंगले, सह अनेक गावकरी मंडळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, गजाननराव देवडे, देवीदास देवडे, बालाजी बादलवाड, शिवाजी कर्वे, परमेश्वर जंगिलवाड,गोविंदराव देशमुख, विशालभाऊ देशमाने,शुभम लालमे, संतोष पवार, गजानन वाघ, नारायण बंडाळे,,गंगाप्रसाद वानोळे ओमकार माटे, गजानन गवळी,रितेश लालमे, सचिन लालमे सह अनेकांनी परिश्रम घेतले.