Ticker

6/recent/ticker-posts

सन्मानाचा शिखर क्षण! भू-मापक प्रकाश शिंदे यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम उत्कृष्ट राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित.



सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा -  राजमाता जिजाऊ माँ साहेबांचे जन्मस्थान असलेल्या या पावन भूमिमध्ये मागील अडीच वर्षांपासून भूमी अभिलेख कार्यालय सिंदखेड राजा येथे भुमापक या पदावर प्रकाश चंद्रकांत शिंदे हे काम करत आहेत, शिंदे हे मूळचे खानापूर ,ता. - अहमदपूर, जि .लातूर येथील आहेत.

भूमी अभिलेख हा विभाग मुख्यता शेतकऱ्यांनाचा आणि पब्लिक कॉन्टॅक्ट असलेला विभाग आहे, मागील अडीच वर्षामध्ये जवळपास 350+ मोजणी काम केले आहेत, लोकांना आपल्या कामाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवून त्यांना कार्यालयाशी जोडून घेण्याचे काम करत गेलो, संपर्क वाढत गेला, लोकांचे समाधान होत गेले आणि मला यांच्या समाधानामध्ये आनंद वाटू लागला.

अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये पुणे मधील चाकण येथे MPSC च्या अभ्यासाला सुरुवात केली आणि आज भुमापक या पदावर त्यांना काम करण्याची संधी मिळाली.अभ्यास करत असताना, स्वतः घडले सोबत अजून खूप साऱ्या मुलांना मार्गदर्शन करुन त्यांना सुद्धा घडवण्याचे पवित्र काम करण्यात आले.पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी उपक्रम राबवला आणि त्यातून आज महाराष्ट्र पोलीस मध्ये एकूण 22 मुले पोलीस म्हणून रुजू.सोबतच टेलिग्राम चॅनेल च्या माध्यमातून होतकरू मुलांना सोबत घेऊन त्यांनी अभ्यास केला आज महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये एकूण 45+ मुले रुजू.याच गोष्टीची दखल घेत मा. उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे साहेबांनी चंद्रकांत शिंदे यांचा विशेष सत्कार केला आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला. सोबतच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP ) मनीषा ताई कदम यांनी सुद्धा चंद्रकांत शिंदे यांच्या कार्याचा सन्मान करुन त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.

अजून लोकांसाठी चांगले काम करायची प्रेरणा यातून त्यांना मिळणार आहे, नक्कीच अजून चांगले काम त्यांच्या कार्यालयाला आणखीन लोकाभिमुख कसे करता येईल यासाठी नक्की प्रयत्न करतील तसेच सर्व स्तरावरुन त्यांचे कैतुक व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे