बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
ग्रामीण भागातील मुलांना कृषीचे आधुनिक ज्ञान मिळावे, भविष्यात चांगले कृषी उदयोजक व्हावेत यासाठी गेली १० वर्ष फाली हा उपक्रम कार्यरत आहे . इयत्ता ८वी व ९वी या वर्गासाठी हा फाली उपक्रम राबवला जातो . सद्गुरू मानाजीबाबा विद्यालय, पळशी येथे पशुविद्या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार साळुंखे उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुलांना मार्गदर्शन केले . डॉ . साळुंखे यांनी जनावरांचे संगोपन कसे करावे , पोषण आहार कसा दयावा , याबद्दल मुलांना सुसंगत व गोष्टी स्वरूपात माहिती दिली . तसेच कृतिम रेतना विषयी माहिती दिली व कृत्रिम रेतन कसे फायदयाचे आहे ते सांगितले . भविष्यात मुलांनी पशुसंवर्धन व संगोपन यासाठी प्रयत्न करावेत . आपल्या जनावरांच्या दूध उत्पादनात पाणी व आहार यांच्या संतुलनाचे महत्व व गरज नमूद केले.
भविष्यात मुला-मुलींनी १२ वी ला चांगले मार्क पाडून पशु वैद्यकीय क्षेत्र करिअर म्हणून निवडावे असे आव्हान देखील केले. कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री मिलिंद काटकर , शिक्षक कुलकर्णी सर, लांडगे सर, बांडे सर ,सौ. घागे मॅडम ,सौ जगताप मॅडम,फाली शिक्षका घोरपडे मॅडम उपस्थित होते.





Social Plugin