Ticker

6/recent/ticker-posts

कल्पनेतील ज्ञान सत्यात उतरवण्याची ताकद विज्ञानात - डॉ .श्री . सुरेशराव जाधव



बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 विद्यार्थ्यांच्यामध्ये अभ्यासक्रमातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत असतो .त्यांच्या बालमनामध्ये अनेक वैज्ञानिक प्रश्न निर्माण झालेले असतात .त्यांच्या मध्ये असणाऱ्या वैज्ञानिक दृष्टीस अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून संधी मिळते .छोट्या छोट्या बालवैज्ञानिकांनी बनवलेली वैज्ञानिक उपकरणे कौतुकास्पद असून त्यांच्या मनातील असणारे ज्ञान प्रत्यक्षात उतरवण्याची संधी अशा प्रदर्शनातून मिळत असते .वैज्ञानिक रांगोळी प्रदर्शन , कलादालन ,तसेच वैज्ञानिक ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थ्यांकरता आदर्शवत ठरत असून ती काळाची गरज आहे .

असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव ची अध्यक्ष डॉ .श्री सुरेशराव जाधव यांनी श्री हनुमानगिरी हायस्कूल  ज्युनिअर कॉलेज पुसेगाव तसेच इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय पुसेगाव यांचे संयुक्त विद्यमाने  आयोजित अपूर्व विज्ञान मेळावा व कला दालनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले .

 कार्यक्रमास संस्था सचिव  श्री मोहनराव जाधव ,विश्वस्त श्री योगेशराव देशमुख ,विश्वस्त श्री एस .आर . पाटील ,केंद्रप्रमुख श्री नवनाथ गावडे साहेब ,विद्यार्थी गुणवत्ता वाढ प्रकल्प अधिकारी श्री . के . डी . पवार सर , प्राचार्य श्री . डी . एन . गोफणे ,वोकेशनल विभाग प्रमुख प्रा जे बी जाधव सर , सो नीलम खटावकर , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .उपाध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव यांनी या विज्ञान प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी पुसेगाव येथील विविध प्राथमिक शाळांनी अपूर्व विज्ञान मेळाव्यास भेट दिली .

छायाचित्र - पुसेगाव -अपूर्व विज्ञान मेळाव्यात आकर्षण ठरलेला सेल्फी पॉईंटचा  आनंद घेताना सर्व संस्था पदाधिकारी व शिक्षक छाया - प्रकाश राजेघाटगे बुध