बुध दि . [प्रकाश राजेघाटगे]
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शैक्षणिक गुणांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा, नवोन्मेष आणि सामाजिक कौशल्यांना वाव देणे ही काळाची गरज ठरत आहे. असे प्रतिपादन शिवाजी विदयापिठाचे प्र . कुलगुरू प्रिं.डॉ अशोकराव भोईटे यांनी केले.
पुसेगाव येथील, श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित श्री सेवागिरी खुला युवा महोत्सव आयोजित केला होता.त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मठाधिपती प .पू. सुंदरगिरी महाराज होते . व्यासपीठावर स्वागतोत्सक श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन श्री.संतोष वाघ, विश्वस्त डॉ.सुरेश जाधव, श्री.रणधीर जाधव, श्री.संतोष जाधव, श्री.सचिन देशमुख,श्री.गौरव जाधव, सचिव युवा महोत्सव संयोजन समिती प्रा.डाॅ.संजय क्षीरसागर,कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आर.पी.भोसले, प्राचार्य विजय गायकवाड, श्री सेवागिरी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक सावंत प्रा.डाॅ.अनिल जगताप प्राचार्य, दत्तात्रय गोफणे, प्राचार्य धनश्री पोतदार,सौ.निलम खटावकर इ. उपस्थित होते.पुढे आपल्या भाषणात डॉ.भोईटे म्हणाले,'विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य संधी दिल्यास आदर्श विद्यार्थी घडतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडून येतो.कला व सर्जनशीलतेच्या प्रोत्साहनामुळे
चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्य, लेखन यांसारख्या कला विद्यार्थ्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेला चालना देतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये कला महोत्सव, कार्यशाळा, विविध स्पर्धा इ.उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. सर्जनशील अभिव्यक्तीमुळे तणाव कमी होऊन कला शिकण्याची आवड निर्माण होते.
आदर्श विद्यार्थी म्हणजे केवळ अभ्यासात हुशार नव्हे, तर शिस्तबद्ध, संवेदनशील, सहकार्यशील आणि नैतिक मूल्यांनी समृद्ध व्यक्ती. नेतृत्वगुण, संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित करण्यासाठी जीवनकौशल्य शिक्षण, समूहकार्य आणि समाजोपयोगी उपक्रम महत्त्वाचे ठरतात.सुप्त गुणांना वाव देण्याचे उपक्रम अनेक शैक्षणिक संस्था ,मार्गदर्शन शिबिरे, करिअर समुपदेशन इ.कार्यक्रम राबवित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी ओळखल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि त्यांची क्षमता उजळून निघते.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आयुष्याकडे सिंहावलोकनात्मक दृष्टीने पाहणे,ध्येय निश्चित करणे, चुका स्वीकारून शिकणे आणि सातत्य ठेवणे हे व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे पाऊल आहे.
आदर्श विद्यार्थी व्यक्तिमत्व घडविणे हे शिक्षणव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असावे. अशा सर्वांगीण प्रयत्नांतूनच आत्मविश्वास, जबाबदार आणि सर्जनशील पिढी निर्माण होईल,असा विश्वास शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केला जात आहे.या विषयीची माहिती सांगितली.अध्यक्षीय भाषणात श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती १०८प.पू.श्रीमहंत सुंदरगिरी महाराज म्हणाले,' समाजात भक्ती, एकात्म, संस्कारांची बीजे रोवणारी ही यात्रा उत्सव आहे.जीवनात गुरूचे ज्ञान अत्यंत महत्त्वाचे आहे.गूरू म्हणजे केवळ शिकवण देणारी व्यक्ती नसून अज्ञानातून ज्ञानाकडे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गदर्शक आहे.संतपरंपरेत गुरूला श्रेष्ठ मानले जाते.भक्ती ही केवळ कर्मकांडपुरती मर्यादित नसून ती माणसाच्या आचार विचारात उतरली पाहिजे भक्तीचा संदेश सत्य, परोपकार, माणुसकी आपल्या संतांनी आपल्या विचारांतून समाजाला नेहमी योग्य मार्ग दाखविला .संतांचे विचार महत्त्वाचे आहेत. यात्रेनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात.या सेवा कार्यामुळे एक व्यापक सामाजिक अर्थ प्राप्त होतो. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी आणि श्री सेवागिरी महाराजांच्या प्रतिमा पूजनांनी झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक मा.डॉ.प्रकाश बच्छाव सहसंचालक (उ.शि.) कोल्हापूर विभाग यांनी युवा महोत्सवासाठी शुभसंदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष वाघ यांनी युवा महोत्सव व श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट विषयी भूमिका स्पष्ट केली. सुत्रसंचालन पर्यवेक्षक श्री.मोहन गुरव यांनी केले.तर आभार श्री .संतोष (बाळासाहेब) जाधव यांनी मानले. कार्यक्रमासाठी विविध महाविद्यालयातील कलाकार विद्यार्थी ,विद्यार्थीनी आणि कला व वाणिज्य महाविद्यालयांतील प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक सर्व उपस्थित होते.





Social Plugin