Ticker

6/recent/ticker-posts

*रानडुकरे-रोही प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पांगरा बंदी-सोनखास परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; वारंवार पत्रव्यवहार करूनही वनविभागाचा कानाडोळा





मालेगाव प्रतिनिधी / जावेद भवानीवाले

मालेगाव : - तालुक्यातील पांगरा बंदी व सोनखास परिसरातील शेतकरी बांधव अक्षरशः हवालदिल झाले आहेत शेतात पेरलेली पिके गहू,हरभरा,तूर,पळाटी—यांच्यावर रानडुकरे व रोही या वन्यप्राण्यांचे भीषण हल्ले सुरू असून शेतकरी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून शेती सांभाळत आहेत परंतु या सर्व परिस्थितीकडे संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी साफ दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. “पत्रव्यवहार कितीतरी वेळा केला... पण प्रतिसाद शून्य!” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांची आहे याचबरोबर राऊत साहेब यांच्यावरही उघडपणे निष्काळजीपणाचे आरोप होत असून,अनेक वेळा लक्ष वेधूनही या भागातील वन्यप्राण्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सर्व शेतकरी बांधवांनी केला आहे 

यावेळी पांगरा बंदीचे ग्रामपंचायत सदस्य तथा समाजसेवक गणेश भाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी,मालेगाव यांना दि.८ डिसेंबर रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.),कार्यालय मालेगाव येथे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की सततच्या पत्रव्यवहारानंतरही अधिकारी दखल घेत नाहीत रानडुकरे व रोही प्राण्यांच्या हल्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत चालले आहेत त्वरित बंदोबस्त न झाल्यास शेतकऱ्यांना उपोषणाशिवाय पर्याय राहणार नाही शेतकऱ्यांची मागणी अगदी स्पष्ट आहे आम्हाला आश्वासन नव्हे; उपाययोजना हव्या अन्यथा आंदोलन!” पांगराबंदी व सोनखास परिसरातील शेतकरी बांधवांनी आज दिलेले निवेदन ही फक्त तक्रार नाही; तर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्धची ठाम हाक आहे जर वनविभागाने आता तरी जागे होऊन पिकांचे संरक्षण करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत,तर या भागात मोठे आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही शेतकऱ्यांचा अंत पाहूनच का विभाग हालचाल करणार? हा प्रश्न आज संपूर्ण परिसर विचारत आहे!