Ticker

6/recent/ticker-posts

*विद्यार्थ्यांनो यश मिळवायचे असेल*विद्यार्थ्यांनो यश मिळवायचे असेल तर अपयशाला घाबरू नका-पीएसआय दिगंबर पवार*



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

 अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे 'संस्कार दिन' या उपक्रमांतर्गत *असा घडलो मी* या विषयावर विचार मांडताना आयुष्य हे चढउतारांनी भरलेले असून यशापर्यंत जाण्यासाठी अपयशाला घाबरून जायचे नाही असा सल्ला प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पो.उ.नि.श्री दिगंबर पवार यांनी विद्यार्थ्यांना दिला.

यशस्वी होण्यासाठी व्यक्तीची जात,धर्म,वय,उंची, रंग,रूप या गोष्टी महत्त्वाच्या नसून तुमच्यातील ऊर्जा महत्त्वाची आहे.सकारात्मक विचार,प्रचंड मेहनत व विचारातील निर्धार तुमच्या यशाचं मूळ आहे.विद्यार्थ्यांनी या जडणघडणीच्या काळात सोशल मीडियाचा वापर कमी करून प्रचंड वाचन केले पाहिजे असे विचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपप्राचार्य प्रा.पांडुरंग खोजे यांनी राष्ट्राला उच्च विभूषित,कुशल त्याचबरोबर चारित्र्यसंपन्न मनुष्यबळाची गरज आहे.वर्गामध्ये दैनिक अभ्यासक्रम पूर्ण करताना संस्कारीक मूल्य बिंबवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.म्हणून अशा स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांची नैतिक मूल्याची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न यासारख्या कार्यक्रमातून केला जातो असे मत मांडले.

अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस यांनी विद्यार्थ्यांनी आपण कोण आहोत यापेक्षा काय आहोत हे सिद्ध केले पाहिजे असा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा शाल श्रीफळ देऊन महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. दादासाहेब गजहंस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्रिया धुमाळ व संच यांनी सारेगामा या स्वागत गीताने केली.

यावेळी पाहुण्यांचा परिचय डॉ.शंकर तिकांडे यांनी करून दिला.या कार्यक्रमास पर्यवेक्षक प्रा. रामप्रसाद भालेकर,डॉ.सुदर्शन तारख,प्रा.महादेव माने,प्रा.वैशाली मगरे,डॉ विजयकुमार कुमठेकर, प्रा.शौकत शेख,प्रा.शोभना भालेराव यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अंकुश गडदे यांनी तर आभार प्रा.बाळासाहेब लुंगाडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.दादासाहेब शिंदे, प्रा.सपना शहाणे,प्रा.गणेश गुंजाळ,प्रा.चंद्रकांत लाटेकर प्रा.कपिल घोलप,प्रा.बालाजी सूर्यवंशी प्रा.शुभांगी राऊत, प्रा.कुलकर्णी, प्रा.नागवे प्रा.सुमा आढाव यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमास विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.