Ticker

6/recent/ticker-posts

सेवागिरी रथावर ८७ लाख ४० हजार .रुपये अर्पण.



बुध  दि. १९ (प्रकाश राजेघाटगे) -

 श्रीसेवागिरी महाजांच्या रथोत्सवासाठी विविध भागातून आलेल्या भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने यावेळी रथावर ८७ लाख ४० हजार  रुपयांच्या नोटा अर्पण केल्या. यावर्षी ७५ ह्जार  रुपयांनी वाढ झाली आहे .

गुरुवार सकाळी दहा वाजता कृष्णा खारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष  ना महेश शिंदे , राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष , आमदार शशिकांत शिंदे , आमदार मनोज घोरपडे यांच्या हस्ते रथ पुजन झाले . यावेळी  मठाधिपती प .पू. सुंदरगिरी महाराज ,  सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष वाघ , विश्वस्त  डॉ . सुरेश जाधव ,  रणधीर जाधव , संतोष जाधव , . संतोष वाघ , सचिन देशमुख , गौरव जाधव ,रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी , जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई , प्रांताधिकारी उज्वला गाडेकर , जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे , तहसिलदार बाई माने , गटविकास अधिकारी योगेश कदम , प्रभारी सरपंच विशाल जाधव  व ग्रामस्थ उपस्थित हाते .   रथपूजन झाल्यानंतर सेवागिरी महाराजांच्या रथाने पुसेगाव प्रदक्षिणेला प्रारंभ केला. श्रीसेवागिरी मंदिरातील समाधीपूजनानंतर झाल्यावर अकरा वाजता रथ मिरवणूकीसाठी हलविण्यात आला . 

राज्यातील विविध भाविकांनी रथावर ८७लाख ४०हजार रुपये अर्पण केले . श्री सेवागिरी महाराजांवरील अपाट श्रध्देमुळे गोरगरीब लोकही ऐपतीप्रमाणे पैसे रथावर अर्पण करुन नतमस्तक होतात .काही कारणास्तव रथोत्सवास येऊ न शकणारे भाविक यात्राकाळात समाधी व रथदर्शनासाठी येऊ रथावर रक्कम अर्पण करतात. त्यामुळे रथावरील रकमेत आणखी वाढ होईलअसे सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांनी सांगितले. रथावरील जमा झालेली रक्कम ही सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे गोरगरिब व्यकींसाठी तसे समाजोपयोगी कार्यासाठी उपयोगी आणली जाते. पोलिस विभागाने सुरक्षिततेसाठी योग्य नियोजन केल्यामुळे अनुचित प्रकार घडत नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप पोमण यांनी सांगितले .अकरा वाजता नोटा मोजण्यास सुरुवात झाली. पहाटे चार वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम पूर्ण झाले.यामध्ये पाचशे रुपयांच्या ६९७३ , दोनशे रुपयांच्या ३८२३ , शंभर रुपयांच्या २६७२५ , पन्नास रुपयांच्या २५६१३, वीस रुपयांच्या १३३३०, दहा रुपयांच्या २२८२७ , पाच रुपयांच्या १४४ रुपयांच्या नोटा रथावरती जमा झाल्या तर वीस रुपयांची १०३ नाणी, दहा रुपयांची २१०० नाणी, पाच रुपयांची १५०० नाणी, दोन रुपयांची २५०० नाणी, एक रुपयांची ४६०० नाणी जमा झाली. त्याचबरोबर परदेशी चलन सुद्धा रथावरती जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन  संतोष वाघ , विश्वस्त डॉ . सुरेश जाधव , रणधीर जाधव, बाळासाहेब  जाधव , सचिन देशमुख, गौरव  जाधव  सचिव विशाल माने , व  ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. पहाटेपर्यंत रथावरील रक्कम मोजण्याचे काम चालू होते, यामध्ये गावातील स्वयंसेवक आणि बँकेतील कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. लाखो भाविकांच्या भक्तांचा पाठीराखा असणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेऊन श्री सेवागिरी महाराजांच्या रथावरती नोटांची माळ अर्पण करणे हा नित्यक्रम गेले अनेक वर्षे अनेक पिढ्यांनी जपला आणि तो वाढत चालला आहे . त्यामुळे रथावरिल देणगी मध्ये दरवर्षी वाढ होत असते .