Ticker

6/recent/ticker-posts

सद्गुरू मानाजीबाबा विद्यालय, पळशी येथे माती परिक्षण.

 


बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे]

 पळशी येथील सद्गुरू मानाजीबाबा विद्यालय, पळशी मध्ये इयत्ता ८ वी व ९वी शिकणाऱ्या फाली (Future Agriculture Leaders of India) च्या विद्यार्थ्यांनी  माती परीक्षण केले .५ डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. फाली म्हणजे भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक. फाली कडून १ डिसेंबर ते ७ डिसेंबर हा सप्ताह माती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे . प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मागील महिन्यामध्ये मातीचे नमुने कसे गोळा करावेत, याचे प्रात्यक्षिक घेतले व त्याप्रमाणे मुलांनी शेतातील मातीचे नमुने गोळा केले व आज शाळेतील प्रयोगशाळामध्ये मुलांनी मातीमधील नत्र ,स्फुरद ,पालाश व सामू याची उपलब्धता किती आहे हे तपासले ज्या मूलद्रव्याची कमतरता आहे त्यावरती उपाय सांगितले.

      फाली मार्फत प्रत्येक वर्षी शाळेमध्ये माती परीक्षण कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते , या कार्यशाळेचा पळशी व परिसरातील जास्तीत जास्त शेतकरयांनी लाभ घ्यावा असे आव्हान केले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री मिलिंद काटकर सर, शिक्षक कुलकर्णी सर, लांडगे सर, बांडे सर ,सौ. घागे मॅडम ,सौ जगताप मडम ,फाली शिक्षका घोरपडे मॅडम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

शाळेचे मुख्याध्यापक एम. डी काटकर सरांनी मुलांना मातीबद्दल माहिती सांगितली मातीचे आरोग्य तपासणी किती गरजेचे आहे माती संवर्धन कसे करावे, मातीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.