बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
श्रीराम विद्यामंदिर म्हासुर्णे ता खटाव येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर बुध चे प्राचार्य अंकुश भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धेत यश संपादित केले .वक्तृत्व स्पर्धेत लहान गटात कु .रिया गणपत जगदाळे तृतीय क्रमांक .मोठ्या गटात निबंध स्पर्धेत कु .मुस्कान मुनाफ मोमीन द्वितीय क्रमांक तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या गटामध्ये .विश्वजीत नाना दडस कु .तन्वी विकास पात्रेकर व कु .ऐश्वर्या अशोक बोराटे यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला .तसेच विश्वजीत नाना दडस यांनी बायोडिग्रेडेबल हे उपकरण सादरीकरण केले .यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह प्राचार्य अंकुश भांगरे , नाना दडस , तानाजी पाटीत , संजय माने , विशाल नाळे, नितीन नारागुडे यांच्या हस्ते देण्यात आले .यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सरपंच सौ .सुजाता बोराटे मॅडम ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपसरपंच अभयसिंह राजेघाटगे ,प्राचार्य अंकुश भांगरे ,पत्रकार प्रकाश राजेघाटगे ,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य,शिक्षक पालक संघ सदस्य, माता पालक बुध व पंचक्रोशी ग्रामस्त ,तसेच विद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनाही अभिनंदन केले . या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भगवान सरवदे ,तानाजी पाटील संजय माने व नितीन नारागुडे यांनी केले .





Social Plugin