Ticker

6/recent/ticker-posts

भोकरदन नगरपरिषद निवडणूक समरीन मिर्झा बेग नगराध्यक्ष पदी विजयी.




 भोकरदन प्रतिनिधी संजीव पाटील 

भोकरदन नगरपरिषद निवडणूक भाजपाचे 9 नगरसेवक विजयी झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांचे  9 नगरसेवक विजयी झाले . काँग्रेस चे फक्त दोन नगर सेवक विजयी झाले. नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट समरीन मिर्झा बेग यांचा 734 मतांनी विजय झाला. ही निवडणूक अत्यंत  अटीतटी ची झाली  अटीतटीच्या लढतीत  भाजपा आणि राष्ट्रवादीचे समसमान  नगर सेवक विजयी झाले. तर  नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटांच्या  समरीन मिर्झा बेग विजयी झाल्या.ही निवडणूक माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी प्रतिष्ठेची केली होती. राजेंद्र देशमुख यांच्या सुनबाई प्रियांका देशमुख यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली, तर भाजपा कडुन सौ.आशाताई माळी यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली.