Ticker

6/recent/ticker-posts

दांडगा जनसंपर्क, दीर्घ कालीन अनुभव; भाजपचा विश्वास गणेश ढाकणे सर यांच्या खांद्यावर,,,,.





महादेव सोनुने ग्रामीण प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरात गेली वीस वर्षे वास्तव्यास असलेले आणि ओबीसी समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय नेते गणेश रामराव ढाकणेसर यांची भारतीय जनता पार्टी (भाजप) ओबीसी–व्हीजेएनटी (VJNT) आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाची, दांडग्या जनसंपर्काची व प्रभावी संघटन कौशल्याची दखल घेत शहराध्यक्ष शत्रुघ्नभाऊ ऊर्फ बापू काटे यांनी ही जबाबदारी पुन्हा त्यांच्याकडे सोपवली आहे.

🔹 भाजप संघटनात्मक कार्य :

२००७ पासून गणेश ढाकणेसर यांनी भारतीय जनता पार्टीच्या मंडळ स्तरावर सक्रियपणे काम केले आहे. प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी २०१६ मध्ये भाजप मंडल जिल्हा सचिवपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

🔹 नेतृत्व व पदे :

आमदार महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिवपदावर काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेत आमदार शंकरभाऊ शेट जगताप यांनी २०२३ मध्ये त्यांच्याकडे ओबीसी-व्हीजेएनटी विभागाच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

🔹 सामाजिक कार्य :

पंकजताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहरातील विविध भागात वंजारी समाजाचे संघटन मजबूत केले. २०२० पर्यंत त्यांनी भगवान सेना पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, तर २०२१ ते २०२४ या कालावधीत जय भगवान महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून उल्लेखनीय काम केले.

🔹 इतर संघटना व चळवळी :

शहरातील ओबीसी संघर्ष समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहून ते शिव, फुले, शाहू, आंबेडकर चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेणारे नेते म्हणून ओळखले जातात.

पिंपरी गावात गेली वीस वर्षे वास्तव्यास असल्याने गणेश ढाकणेसर यांचा घराघरात दांडगा जनसंपर्क आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध आहे. युवकांचे संघटन करण्यात त्यांचा मोठा वाटा असून केवळ प्रभावीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवड शहरातील युवकांमध्ये त्यांची मोठी फळी उभी आहे.

गणेश ढाकणेसर यांनी विश्वास व्यक्त करताना सांगितले की,

“पिंपरी प्रभाग क्रमांक 21 ओबीसी , ब,मधून भारतीय जनता पक्ष योग्य उमेदवार म्हणून संधी देईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. पक्षासाठी काम करत राहणे हेच माझे ध्येय आहे आणि मी पक्ष जे काम देतील ते मी करत आलो आणि करत राहील.”

सद्यःस्थितीत आमदार उमाताई खापरे व अमित गोरखे यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी-व्हीजेएनटी समाजाचे संघटन पिंपरी-चिंचवड शहरात अधिक बळकट करण्याचे काम गणेश ढाकणेसर सक्रियपणे करीत आहेत. नियुक्तीपत्र देताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे, भाजप युवा मोर्चाचे दीपकभाऊ नागरगोजे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.