Ticker

6/recent/ticker-posts

खडकपूर्णा नदीतील दुर्घटनेचा शेवट; बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.



खडकपूर्णा नदीपात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाचव्या दिवशी २३ डिसेंबर रोजी पाण्यावर तरंगलेला आढळून आला.

सिंदखेडराजा / ज्ञानेश्वर तिकटे

सिंदखेडराजा :- तालुक्यातील  ताडशिवणी येथील गौतम गवई हा ५ दिवसापूर्वी खडकपूर्णा नदीच्या पात्रात लाईनचे काम करीत असताना पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला होता. या घटनेनंतर पोलिस प्रशासनाने नदीपात्रासह नदीकाठचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आहे. तरीही यश आले नाही. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी गोरखनाथ पवार यांनी घटनेची माहिती तहसीलदार अजित दिवटे यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एनडीआरएफचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले. पीएसआय ताराचंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सलग दोन दिवस अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने नदीपात्रात शोधमोहीम राबवली. मात्र खोल पाणी, गाळ व प्रवाहामुळे मृतदेहाचा ठोस माग काढण्यात अपयश आल्याने २२ डिसेंबर रोजी पैठण येथील अनुभवी पाणबुड्यांनाही पाचारण करण्यात आले. त्यांनी नदीपात्रातील विविध संभाव्य ठिकाणी सखोल शोध घेतला. तरी चौथ्या दिवशीही मृतदेह आढळून आला नाही. मात्र मंगळवारी सायंकाळी सदर मृतदेह अखेर पाण्यावर तरंगून वर आला. सदर मुतदेह पोलीसांनी ताब्यात घेवून पंचनामा केला व पुढील कारवाई सुरू होती.

या शोधकार्यादरम्यान तहसीलदार अजित दिवटे व महसूल विभागचे कर्मचारी तसेच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार संजय मातोंडकर, पोलीस कर्मचारी अनिल नागरे, जीवन जायभाये सह ताडशिवणीचे पोलीस पाटील यांनी परिश्रम घेत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले