भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड युथ फाउंडेशन द्वारा आयोजित उत्सव पर्व नवा..हर्ष नवा..उत्साह नवा...युवा महोत्सव 2025 चा समारोप सांस्कृतिक,बौद्धिक,सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा आणि मनोरंजनात्मक अशा विविध कार्यक्रम पाच दिवस यशस्वीरित्या पार पडले.महोत्सवाचा शेवटचा पाचवा दिवस सुध्दा विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी पार पडला. हा कार्यक्रम स्थानिक पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृह येथे पार पडला.
युवा महोत्सवाची सांगता बक्षीस समारंभ व सत्कार समारंभ ने झाली.पाच दिवसीय युवा महोत्सव मध्ये पार पडलेल्या विविध स्पर्धाच बक्षीस विजयी स्पर्धकांना प्रदान करण्यात आली. बक्षीस वितरण शिवकाशी डेव्हलपर्स अँड बिल्डर्स संचालक वसंता डांगरे उमरेड यांचे सौजन्य लाभले.
सत्कार सोहळा उमरेड युथ फाउंडेशन द्वारा युवा महोत्सव 2025 ला प्रमुख अतिथी च्या हस्ते श्रावणी खोब्रागडे,ऋषभ बोरीकर,राजवीर बोडने, आर्या पोंगडे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती चा परीचय रोशन पोकळे यांनी केला..सूरसंगम हिंदी - मराठी सुरांची अविस्मरणीय मैफिल सादरकर्ते सचिन ढोमणे,सुरभी ढोमणे क्रिरेशन ग्रुप नागपूर यांनी सादर केला.
समारोपीय कार्यक्रमात मंचावर ,शिवकाशी देव्हलपर्स चे संचालक वसंता डांगरे,सामाजिक कार्यकर्त्या प्राजक्ता रोहित कारू,,माजी आमदार सुधीर पारवे, बाजार समिती तज्ञ संशालक ॲड.विजय खवास ,संस्थेचे संस्थापक अनिलकुमार गोविंदांनी अध्यक्ष दीपक पटले , संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदमवार, पूर्वाध्यक्ष संजय मौदेकर,संयोजक सचिन कुहिकर सचिव गौरव रहाटे.प्रामुख्याने उपस्थित होते.तसेच शहरातील गणमान्य व्यक्ती भाजपा जिल्हा अध्यक्ष आनंदरावजी राऊत माजी नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया कार्यक्रमाला हजर होते. सत्कार समारंभ संचालन रोशन पोकळे,बक्षीस वितरण संचालन मनीष बालपांडे व कार्यक्रम
संचालन रितेश राऊत यांनी केले तर आभार गौरव रहाटे यांनी मानले.युवा महोत्सव यशस्वीतेसाठी कैलास लारोकर,राजेश जिकार,,विजय जैस्वानी, किशोर आदमने,संजय चाचरकर,सतीश चकोले,प्रवीण लाडेकर, प्रांजल डहाके,विशाल बावणे प्रफुल वाघमारे ,समर भगत,पवन मडावी,पंकज गजभिये,शुभम सिर्सीकर,राकेश जमखंडे,स्वप्निल गवळी,,मुकेश गौतम,आशिष वंजारी,जय मुलचंदानी,श्रीकांत बोरकर, आदींनी परिश्रम घेतले.





Social Plugin