Ticker

6/recent/ticker-posts

शिरढोण येथील मागसवर्गीय शौचालयप्रश्नी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करु .



जिल्हा परिषद .मुख्याधिकारी याशीनी नागराजन यांचे आश्वासन,   रमेश उबाळे यांचे आंदोलन चार दिवसानंतर   स्थगित 

बुध दि [प्रकाश राजेघाटगे ] 

शिरढोण ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय महिलांचे पाडलेल्या शौचालंयाचे काम सहा महिने विलंब लावणाऱ्या संबधीत अधिकाऱ्यांची चौकशी करुन त्यांच्यावर उचित कारवाई करण्याचे लेखी आदेश   जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी याशिनी नागराजन यांनी  उपमुख्य कार्यकारी यांना  देऊन  रिपब्लिकन सेनेचे राज्य पातळीवरील नेते रमेश उबाळे यांना  उपोषण आंदोलन मागे घेण्याची  विनंती केल्यानंतरं आंदोलकानी आपले आंदोलन मागे घेतले.

       शिरढोण, ता.  कोरेगाव  येथील मागासवर्गीय समाजाच्या महिलांसाठी तत्काळ सार्वजनिक  स्वच्छतागृह बांधून द्या.रोटी, कपडा आणि मकान यांचबरोबर आता स्वच्छतागृहाची गरज असल्याने  मगासवर्गीय महिलांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या  कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना तसेच सरपंच, ग्रामसेवक यांना  ताबडतोब नीलंबीत करा मी लगेच आपले उपोषण आंदोलन मागे घेतो  असे मत रिपब्लिकन सेनेचे राज्य पातळीवरील नेते तसेच आंदोलनकर्ते  रमेश उबाळे यांनी व्यक्त करत सातारा येथे जिल्हा परिषद कार्यालयासमोर 

  शिरढोण येथील मागासवर्गीय महिलांचे  सार्वजनिक आठ  स्वच्छतागृह एका समाजकंटकाने   पाडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रमेश उबाळे यांनी गुरुवारी   जिल्हा परिषदेसमोर यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. होते गेली चार दिवस हे उपोषण आंदोलन सुरूच होते 

   शिरढोण  येथील  मगासवर्गीय महिलांसाठी बांधण्यात आलेले आठ स्वच्छतागृह एका समाजकंटकाने पाडले आहे.पाच महिने झालेतरी महिलांसाठी पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने महिलांना उघड्यावरच शौचास बसावे लागत आहे.  विशेष म्हणजे कोरेगाव पंचायत समितीमध्ये गटवीकास अधिकारी महिला आहेत तरीही त्यांनी   आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे हेच आमचे दुर्दैव आहे. म्हणून महिला गटविकास अधिकारी व शिरढोणच्या सरपंचांना तत्काळ नीलंबीत करुन शिरढोण येथील महिलांसाठी ताबडतोब स्वच्छतागृह बांधून दिल्याशिवाय आपण आपले उपोषण आंदोलन मागे घेणार नाही. अशी ठाम भूमिकाही त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान सोमवारी मुख्याधिकारी याशिनी नागराजन यांनी रमेश उबाळे वं उपस्थित आंदोलकांना लेखी पत्र देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 

     मुख्याधीकारी याशीनी नागराजन यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, शिरढोण ता. कोरेगाव येथील मागासवर्गीय लोकांचे शौचालय पाडल्याने त्या ठीकणच्या महिलांना गेली सहा महिने उघड्यावर  जावे लागल्याने रमेश उबाळे, विशाल भोसले हे दि. 18.12.2025 पासुन जिल्हा परिषदेसमोर उपोषणास बसलेले आहेत. 

    सदर उपोषणकर्ते रमेश उबाळे व इतर आंदोलकाशी चर्चा झाली त्यांच्या  म्हणण्यानुसार जरी शौचालय बांधकाम सुरू करण्यात आले असले तरी सदर बांधकामास विलंब लावणाऱ्या सर्व संबंधीत यांचेवर कारवाई होणे आवश्यक आहे. या अनुषनगाने सूचित करण्यात येते की, उपरोकृत बाबत तपासणी करुन वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करावा व सदर विलंबास जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर नियमानुसार  उचित कारवाई करण्यात यावी. असे म्हटले आहे. 

       सदर बाबीस कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकासं अधिकारी,  सरपंच आदी जबाबदार असल्याचे रमेश उबाळे व आंदोलकानी  यांनी निदर्शनास आणले. संबंधीत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रमेश उबाळे यांनी  मुख्याधिकारी याशिनी नागराजन यांचे आभार मानत आपले उपोषण आंदोलन मागे घेतले.

    या  आंदोलनात  रमेश उबाळे यांचेबरोबर   रिपब्लिकन सेनेचे महासचिव नितीन रोकडे, तालूका अध्यक्ष दीपक गाडे, गौतम रणदिवे, रमेश गायकवाड, उजवला कांबळे, अरुणा खंडाईत, सविता खंडाईत, अनिता खंडाईत, सविता खंडाईत,  अनिता खंडाईत, सुजाता खंडाईत, वंदना खंडाईत सुनीता जावळे, सारिका येंवले, सुनीता येंवले, सूनंदा खंडाईत, हेमाताई खंडाईत, शर्मिला खंडाईत, निरा कांबळे, आदी महिला सहभागी झाल्या होत्या.  

     रमेश उबाळे यांनी आतापर्यंत सर्वसामान्य जनतेचे ज्वलंत  प्रश्न  उपस्थित करुन न्याय मिळवून दिला आहे. शिरढोण  येथील मागासवर्गीय  महिलांनी रमेश उबाळे यांना धन्यवाद देत पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.