Ticker

6/recent/ticker-posts

राजापूर हायस्कूल राजापूर मध्ये माती आरोग्य तपासणी कार्यशाळेचे आयोजन .

    


बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]

 राजापूर हायस्कूल राजापूर मध्ये इयत्ता 8 वी व 9 वी तील शिकणाऱ्या फालीच्या विद्यार्थ्यांनी आज 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवस साजरा केला. फाली म्हणजे भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक. या विषयांतर्गत एक डिसेंबर ते सात डिसेंबर हा सप्ताह माती दिन म्हणून साजरा केला जातो. यामध्ये विद्यार्थ्यांना मातीचे नमुने कसे गोळा करायचे याचे प्रात्यक्षिक दिले जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थी आपल्या शेतामधून नमुने घेऊन येतात. आज शाळेतील प्रयोगशाळेमध्ये मुलांनी माती मधील नत्र, स्फुरद, पालाश व सामू यांची उपलब्धता किती आहे हे तपासले ज्या मूलद्रव्याची कमतरता आहे त्यावरती उपाय सांगितले.

या कार्यशाळेस हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री अशोक वळवी सर, शिक्षक एच. जी. जाधव सर, व्ही. ए. कचरे सर, सौ. साळुंखे मॅडम फाली शिक्षक डोंगरे मॅडम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख माननीय श्री वळवी सरांनी मुलांना मातीबद्दल माहिती सांगितली मातीचे आरोग्य तपासणी किती गरजेचे आहे माती संवर्धन कसे करावे, मातीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करावा. याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री विजय कचरे यांनी केले.