Ticker

6/recent/ticker-posts

घुंगर्डे हादगाव येथे हरिनामाने कलशारोहण सोहळा संपन्न








 



अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील माऊली वारकरी शिक्षण संस्था आयोजित माऊली मंदीराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कलशाचे पुजन एकनाथानंद भोलेबाबा यांच्या हस्ते माऊली कलशाचे पुजन करण्यात आले.गावात मिरवणूक काढण्यात आली.

भक्ती मय वातावरण सर्व गाव हरिनामाने मंत्रमुग्ध झाले.वारकरी संप्रदायाचा पाऊलखाना जपणारा हा कार्यक्रम संत महंताच्या आशीर्वादाने पार पाडला.हा सोहळा गावच्या एक जुटीचा आणि भक्तीची अखंड परंपरा जपण्याचा ऐतिहासिक क्षण ठरला आहे.भक्ती भावाने सोहळ्याची सुरुवात या महायज्ञ व कलशपूजनाने झाली.

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी श्रद्धेने पार पडल्या.माऊलीच्या चरणी अर्पण या विधीने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता.ह.भ.प महेश महाराज गिरी यांचे किर्तन झाले.व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला ह.भ.प भागवत महाराज दोबाले यांनी उपस्थित सर्व साधुसंताचे आभार मानले.कीर्तन कार्यक्रमाने भक्तीचा झरा उचंबळून आला.

भक्ती पूर्ण वातावरणात आणि माऊलीच्या नामस्मरणाने हदगाव नगरी दुमदुमून गेली होती. संत महंताच्या उपस्थिती ने सोहळ्याची शोभा वाढविली.२०० हुन अधिक टाळकरी मंडळी उपस्थित होती.या सोहळ्याला माझी आरोग्य मंत्री राजेश भैय्या टोपे,सतीश दादा होंडे,शेखर बापू सोळुंके,मनोज मरकड,प्रकाश तात्या बोरडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.