परतुर प्रतिनिधी:-लक्ष्मण बिल्हारे
वलखेड येथील माजी सरपंच वैजनाथ वाघमारे यांनी ग्रामविकास अधिकारी शिवाजी आटोळे यांना नमुना नंबर आठ ची मागणी केली असता ग्रामविकास अधिकारी शिवाजी आटोळे यांनी माझ्याकडे गाव नसल्याचे कारण सांगून उडवा उडवीचे उत्तरे देऊन त्यांना नमुना नं :- ८ देण्यास नकार दिला तसेच रोजगार हमी योजनेतील तांत्रिक अधिकारी वैभव शिंदे हे सुद्धा विहीर, वृक्ष लागवड, व इतर लाभाचे काम शासनाकडून मंजूर झालेल्या कामांचे मजुराचे मस्टर काढण्याकरता गेले असता गाव माझ्याकडे नाही असे सांगतात परंतु सदरील दोन्ही विषयाच्या अनुषंगाने तक्रारदार वैजनाथ वाघमारे यांनी पंचायत समिती येथील कर्मचारी OS साहेबांना आमचे वलखेड गावासाठी तांत्रिक अधिकारी व ग्रामविकास अधिकारी कोण आहे अशी विचारणा केली असता तांत्रिक अधिकारी पदी वैभव शिंदे आहेत व ग्रामविकास अधिकारी पदी शिवाजी आटोळे आहेत असे ओएस साहेबांनी सांगितलेले आहे तरी तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार माननीय गटविकास अधिकारी तांगडे साहेबांनी संबंधित सर्व कर्मचारी यांना आदेशित करून गावातील कुठल्याही नागरिकांची समस्या असेल तर त्या समस्याच निवारण करण्याच्या सूचना देण्यात याव्या व वलखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या नावाची यादी हुद्दा व मोबाईल नंबर सहीत गावामध्ये प्रकाशित करावी व तक्रारदारास एक प्रत देण्यात यावी अशी विनंती या तक्रार अर्जानुसार करण्यात आली आहे. यावेळी तक्रारदार माजी सरपंच वैजनाथ वाघमारे, बबनराव येडेकर,शिवाजीराव सुरुंग, ऋषीकेश बिल्हारे आदी ग्रामस्थ उपस्थित होते





Social Plugin