मंगेश पुंड @ग्रामीण प्रतिनिधी
आज नगरपरिषद निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व हिंगोली वर शिवसेनेचा भगवा फडकला.विशेष बाब म्हणजे हिंगोलीत भाजप उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेऊन देखील भाजपचा पराभव झाल्यामुळे हिंगोली जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे असे आमदार संतोष दादा बांगर यांनी प्रतिक्रिया दिली. आमदार संतोष दादा बांगर यांच्या भावजय रेखाताई श्रीराम बांगर ह्या हिंगोली नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या असून त्यांच्या सोबत शिवसेनेचे 17 नगरसेवक विजयी झाले आहेत.
नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रेखाताई श्रीराम बांगर यांनी तब्बल 10 हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच कळमनुरी मध्ये आमदार संतोष बांगर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी वैभव चौधरी (आर.आर.पाटील) यांच्या पत्नी आश्लेषा वैभव चौधरी 1383 मतांनी विजयी झाल्या आहेत. दोन्ही नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवून आमदार संतोष दादा बांगर यांनी त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार संतोष बांगर हे सतत जनतेच्या सुख-दुःखामध्ये धावून जातात.जनतेच्या समस्या तात्काळ सोडवतात त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व कायम राहील असे चित्र आहे.





Social Plugin