Ticker

6/recent/ticker-posts

श्री सेवागिरींच्या यात्रा नियोजनासाठी आज शुक्रवारी शासकीय अधिकाऱ्यांची बैठक.



यात्रेशी संबंधीत सर्वच खात्यांच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे ट्रस्टचे आवाहन

बुध   दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

 महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, गुजरात राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव ता खटाव येथील प पू श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि १४ ते  २४ डिसेंबर  या कालावधीत वार्षिक यात्रा संपन्न होत आहे.लाखों भाविकांच्या उपस्थितीत सलग अकरा दिवस चालणाऱ्या या यात्रेच्या नियोजनासाठी आज शुक्रवार दिनांक ५ रोजी दुपारी ११ वाजता शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ यांनी दिली.

    जिल्हाधिकारी संतोष पाटील  व आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील श्री सेवागिरी सांस्कृतिक भवन दुसरा मजला येथे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज,ट्रस्ट चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ सुरेश जाधव,रणधीर जाधव,संतोष (बाळासाहेब),सचिन देशमुख, गौरव जाधव उपस्थित राहणार आहेत.

   यात्रा नियोजनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच खात्याच्या शासकीय अधिकाऱ्यांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी गेल्या महिनाभरापासून गावातील ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते, विविध कमिटीचे पदाधिकारी ,सदस्य,देवस्थान ट्रस्ट चे विश्वस्त व कर्मचारी,ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे.विविध खात्याच्या शासकीय अधिकाऱ्यांनी ही योग्य नियोजन करून यात्रा अधिकाधिक कशी बहरेल यासाठी प्रयत्न करावेत. संतोष वाघ,देवस्थान ट्रस्ट चेअरमन.