Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड ग्रामीण परिसरात दिवसाढवळ्या तरुणावर वाघाचा हल्ला -



भाग्यश्री धकाते @ उमरेड ग्रामीण प्रतिनिधी 

 उमरेड ग्रामीण एक २२ वर्षीय तरुण बाइक ने उमरेड वरून चिमूर कडे जात असताना नेशनल हायवे 353 वर अचानक वाघाने तरुणावर हल्ला केला यामध्ये तरुण किरकोळ जखमी झाला असून तरुणाला उमरेड मधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

याचा आधीपण मागच्या महिन्यात अशा प्रकारची घटना घडली होती त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून सध्या मुछेपार ची यात्रा सुरु असल्यामुळे रस्त्यावर गर्दी राहते सोबतच उमरेड M. I.D.C. औद्योगिक क्षेत्र जवळ आहे त्यामूळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.यासाठी नागरिकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.