भाग्यश्री धकाते उमरेड ग्रामीण प्रतिनिधी
उमरेड - . निवेदनाच्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब आडे सर यांना निवेदन सुप्रीत करण्यात आले या निवेदनाच्या माध्यमातून काही मागण्या करण्यात आल्या 1. भटक्या समुदायातील अतिक्रमण धारकांना 75 वर्षाचा पुरावा मागितला जातो त्यामध्ये भटक्या समुदायातील लोकांना या कायद्याअंतर्गत शिकेलता असणे गरजेचे आहे जेणेकरून ते आपले पुरावे सादर करू शकतील.
2. वन हक्क कायद्या अंतर्गत ज्या लोकांना वन हक्क पट्टेधारक आहेत त्यांना त्यांचे संयुक्त सातबारा असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ मिळत नाही तर त्यांना सातबारा वेगळा करून द्यावा ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे शासनाने ही जबाबदारी स्वीकारावी आणि त्यांना सातबारा वेगळा करून द्यावा
3 वन हक्क कायद्याअंतर्गत अतिक्रमण शेतजमिनीचे दावे दाखल केले आहेत त्या दाव्यांची सुनवाई लवकरात लवकर करण्यात यावी आणि दावे मंजूर करण्यात यावी या मागण्यांना घेऊन आज संस्थेचे उपाध्यक्ष श्री माननीय रवींद्र कुरडकर, सचिव विनोद पवार, संस्थेचे कार्यकर्ते सुभाष मेश्राम नीतीच्या माळी सुभाष सुभाष मेश्राम, ऋषी माडी उपस्थित होते.





Social Plugin