सिल्लोड –प्रतिनिधी आकाश कोके
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील धनगर वस्तीवरील रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत होता. मोठमोठे खड्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले होते. रात्रीच्या वेळी वाहन अपघातांचा धोका वाढला होता. या रस्त्याने शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी-चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात त्रास साहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, सरपंच दिलीप जाधव यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता पूर्णपणे गुळगुळीत करून दिला. कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता त्यांनी तातडीने साहित्य व यंत्रसामग्री उपलब्ध करून काम सुरू केले. काही दिवसांतच रस्त्याची दुरवस्था दूर झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
रस्ता सुरळीत झाल्यामुळे आता वाहतूक सुलभ झाली असून शाळकरी मुले सुरक्षितपणे ये-जा करू लागली असून महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना देखील मोठा फायदा झाला आहे. विशेषतः पावसाळ्यात होणाऱ्या अडचणी आता दूर झाल्याचे नागरिक सांगत आहेत.
धनगर वस्तीतील नागरिकांनी विश्वास दाभाडे यांच्या या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून त्यांच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत. लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासनांपुरते न थांबता प्रत्यक्ष कृतीतून विकासकामे करावीत, असे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विश्वास दाभाडे यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे पिंपळगाव पेठ परिसरात सकारात्मक चर्चा होत असून त्यांनी आदर्श निर्माण केल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
या वेळी सरपंच दिलीप जाधव, उपसरपंच राजु बेलेवार, ज्ञानेश्वर जाधव, यांच्या सह गावकरी उपस्थित होते





Social Plugin